हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वाशिम जिल्ह्यात अवैध सावकारीवर दणका! रिसोडमध्ये दोन ठिकाणी धडक छापे

Follow Us:
वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये अवैध सावकारीवर सहकार व पोलिस विभागाची धडक कारवाई

रिसोड (वाशिम) |१५ जानेवारी २०२६

वाशिम जिल्ह्यात अवैध सावकारीवर दणका देत प्रशासनाने रिसोड तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. रिसोडमध्ये अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने सहकार व पोलिस विभागाने संयुक्तपणे दोन ठिकाणी धडक छापे टाकले. वाशिम जिल्ह्यातील अवैध सावकारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

दि. ९ जानेवारी २०२६ रोजी रिसोड तालुक्यातील बाल समंदर, चांदनी चौक येथील रहिवासी अब्दुल रऊफ शेख चांद तसेच नागझरी–गोंदाळा येथील भगबान तुकाराम गुडधे यांच्या घरांवर सहकार व पोलिस विभागाच्या स्वतंत्र पथकांनी झाडाझडती घेतली. या कारवाईदरम्यान पुढील चौकशीसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.ही धडक कारवाई महाराष्ट्र सावकारी कायद्यातील कलम १६ अंतर्गत करण्यात आली असून संबंधित व्यक्तींविरोधात अधिक तपास सुरू आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई पार पडली.

या मोहिमेत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रिसोड गजानन फाटे यांच्यासह विविध तालुक्यांतील सहकार अधिकारी, लिपिक, कर्मचारी तसेच पोलिस व महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

हे पण वाचा..

वाशिम जिल्ह्यात मोठा संतापजनक प्रकार! मस्टरच्या पैशांसाठी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याची मारहाण; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात निर्भयपणे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम आणि संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रारी नोंदविता येतील. तक्रारदाराचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती सहकार विभागाने दिली आहे.


📢 नागरिकांसाठी आवाहन

अवैध सावकारीमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ सहकार विभाग किंवा पोलिस प्रशासनाकडे तक्रार नोंदवा. प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.


👉 हे पण वाचा..


📌 अधिक अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२७ पाहताना महाराष्ट्रातील विद्यार्थी

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! पाहा, परीक्षा कधीपासून सुरू होणार

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

Leave a Comment