हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मोप शेतशिवारात तुरीची धक्कादायक चोरी; दिव्यांग शेतकऱ्याचे 15 हजारांचे नुकसान

Follow Us:
मोप शेतशिवारात तुरीची चोरी झालेल्या शेतात पाहणी करताना शेतकरी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड | २१ जानेवारी २०१६

मोप तुरीची चोरी ही घटना वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोप गावाच्या शेतशिवारात घडली असून,
दिव्यांग शेतकऱ्याच्या मेहनतीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

मोप येथील अर्जुन मोतीराम नरवाडे (वय 61), व्यवसायाने दिव्यांग शेतकरी असून त्यांची
गट क्रमांक 115 मध्ये सुमारे 3.5 एकर शेती आहे.
या शेतात त्यांनी तुरीची पेरणी केली होती.

दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी तुरीची कापणी करून ती वाळण्यासाठी शेतातच ठेवण्यात आली होती.
दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तूर शेतात सुरक्षित होती.

मात्र 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शेतात गेल्यावर
कापून ठेवलेल्या तुरीपैकी काही रांगा गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता कोणालाही याबाबत माहिती मिळाली नाही.

या चोरीत अंदाजे दीड क्विंटल तूर चोरीस गेली असून,
शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार सुमारे 15 ते 16 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून,
प्राथमिक रिपोर्टमध्ये तुरीची किंमत अंदाजे 4,900 रुपये नमूद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान चोरीस गेलेला माल हस्तगत झाल्यास
त्याप्रमाणे अंतिम नुकसानाची रक्कम निश्चित केली जाईल.

सध्या पोलीस अधिक तपास करत असून, शेतमाल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे
शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


📌 कट्टा न्यूज आवाहन

शेतकऱ्यांच्या समस्या, अन्याय व गुन्हेगारी घटनांबाबत आवाज उठवण्यासाठी
Kattanews.in सतत कटिबद्ध आहे.
अशा घटना घडत असल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाला कळवावे.


🔗 Related News

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment