या नायगाव दत्तापूर स्टेट बँक फोडण्याच्या या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.सविस्तर असे की नायगाव दत्तापूर येथील स्टेट बँक शाखेच्या मागील बाजूची खिडकी फोडून चोरट्यांनी रात्री बँकेत प्रवेश केला. मात्र त्यांचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला.बँकेतील रोख रक्कम, लॉकरमधील दागिने आणि महत्वाची कागदपत्रे सुरक्षित असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक सोनल विजय खैरे यांनी दिली.
सिक्युरिटी अलार्म आणि CCTV सिस्टम डॅमेज
चोरट्यांनी सुरक्षेत असलेला अलार्म सिस्टम डॅमेज केला होता तसेच कॅश काउंटर मागील कॅमेरा तोडून टाकला होता.सुदैवाने इतर कॅमेऱ्यातील फुटेज सुरक्षित राहिल्याने दोन्ही चोरटे स्पष्ट दिसून आले.
फिर्यादीवरून अप. क्र. ४०६/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ठाणेदार आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मोहन सावंत आणि टीम करीत आहे.
घटनेनंतर बुलडाणा येथील श्वानपथक, ठसेतज्ञ आणि न्यायवैद्यकीय तज्ञांनी घटनास्थळी तपास केला. तथापि, घटनेच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही.
🔍 Related News
- दारूच्या नशेत शिक्षकाचा प्रार्थनेदरम्यान जमिनीवर लोळण! ZP शाळेतील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल — CEO ची तात्काळ कारवाई.
- २ किलो गांजा जप्त! बुलढाणा LCB ची धडक कारवाई, ५७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
👉 आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
🔥 ताज्या अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक बातम्यांसाठी आमचा WhatsApp ग्रुप ताबडतोब जॉईन करा!












