हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

३८ वर्षांनंतर कृषी विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण!

On: November 12, 2025 10:35 PM
Follow Us:

बुलढाणा/विशाल गवई, दि. 11 (जिमाका): ३८ वर्षांनंतर राज्याच्या कृषी विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्राप्त झाले. ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या घोषवाक्याचे आणि नव्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी विभागाच्या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्य अनावरण सोहळ्यात बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानही करण्यात आला.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

“हा लोगो म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ” — दत्तात्रय भरणे

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “महाराष्ट्राची शेती परंपरागत असूनही सतत नव्या दिशेने वाटचाल करणारी आहे. कृषी विभागाचे हे नवे बोधचिन्ह म्हणजे केवळ प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहे. या लोगोमधून शेतकऱ्यांची शक्ती, तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश दिला आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रगतीचे प्रतीक बनेल. हा बदल म्हणजे ‘नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ’ आहे.”

३८ वर्षांपूर्वीचे बोधचिन्ह आता झाले इतिहासजमा

भरणे यांनी सांगितले की, “कृषी विभागाचे विद्यमान बोधचिन्ह सुमारे ३८ वर्षांपूर्वी तयार झाले होते. या काळात शेतीत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती आणि हवामानबदलामुळे मोठे परिवर्तन झाले. त्यामुळे विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करणे गरजेचे झाले होते.”

यासाठी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली होती आणि जनतेकडून अनेक प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातूनच आज राज्याच्या कृषी विभागाला नव्या युगाचे प्रतीक असलेले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्राप्त झाले आहे.

👉 महाराष्ट्रातील शेती, कृषी योजनांबाबत आणि शेतकरी अपडेटसाठी KattaNews.in वर दररोज भेट द्या.

🔗 Related News:

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेवर रविकांत तुपकरांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

कर्जमाफीच्या यादीत तफावत? रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा; भूमिका स्पष्ट न केल्यास राज्यव्यापी आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथे रोही (नीलगायी)च्या कळपाने शेतकरी राम रतन पवार यांच्या दोन एकरांतील कपाशी पिकाचे केलेले नुकसान

सिंदखेडराजा: रोही (नीलगायी)च्या कळपाने दोन एकरांतील कपाशी उद्ध्वस्त; शेतकरी राम रतन पवार यांचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील १०४६७ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यादी २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील १०,४६७ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यादी जाहीर; ‘हे’ काम त्वरित करा अन्यथा लाभ मिळणार नाही

पंजाब डख किनगाव राजा येथे हवामान बदलावर व्याख्यान देताना

हवामान बदलावर पंजाब डख यांचं स्पष्ट भाकीत — शेतकऱ्यांनी पीकनियोजन आत्ताच बदला

शेतकरी कर्जमाफी : 56 लाख शेतकऱ्यांपैकी पहिली यादी जाहीर, तुमचं नाव आहे का यात? पाहा संपूर्ण माहिती

Leave a Comment