हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
रिसोडचा मुख्य बाजार रस्ता ४ वर्षांपासून अंधासरपखेड–धोडप बुद्रुक रस्ता 10 वर्षांपासून खड्Reel बनविताना भीषण अपघात! युवकाचा रेल्वेखाली कटLadki Bahin Yojana eKYC Deadline: मुदतवाढ होणार का? आदिती तटकरेंचीमहायुतीने सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच सोबत;लोणारमध्ये स्प्रिंकलरच्या 1,000 तोट्यांची धक्क

मेहकरात “पर्पल फूड कॉर्नर” वर पोलिसांची धाड! तीन अल्पवयीन जोडपी पकडली; शहरात खळबळ.

On: November 12, 2025 7:08 AM
Follow Us:

 मेहकर/ (प्रतिनिधी)

मेहकर शहरातील “कॅफे कल्चर”च्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील चाळ्यांवर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

लक्ष्मीनारायण कॉम्प्लेक्समधील “पर्पल फूड कॉर्नर” या कॅफेवर मेहकर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून
तीन अल्पवयीन प्रेमीयुगुलांना पकडले तसेच पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

💥 कॅफेंच्या नावाखाली अनैतिक कृत्ये

अलिकडच्या काही महिन्यांत मेहकर शहरात विविध “कॅफे सेंटर” सुरू झाली आहेत.
अनेक ठिकाणी मालकांनी खासगी खोल्या तयार करून त्या प्रेमीयुगुलांना
तासाच्या भाड्याने देण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

🚔 गुप्त माहिती मिळताच पोलिसांची कारवाई

१० नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० ते १२.३० च्या दरम्यान पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत छापा मारला.
या धाडीत तीन अल्पवयीन प्रेमीयुगुलं आढळून आली. कॅफेत खास “प्रायव्हेट रूम्स” बनवून तिथे प्रवेशासाठी
₹१५० ते ₹२०० आकारले जात होते.

👮‍♂️ आरोपींवर गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणात निलेश शरद सोमन (३२) आणि कार्तिक गणेश चव्हाण (२२)
या कॅफेच्या भागीदारांविरुद्ध सार्वजनिक नैतिकतेचा भंग व शासनाच्या नियमांचे उल्लंघन
केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, आकाश दिलीप वाहेकर (२५), आदित्य राजेश भातखोडे (२५) आणि
हर्षल अशोक इंगोले (२४) हे तिघेही अश्लील कृत्य करताना आढळले.

पोलिसांनी ठिकाणावरून HF डिलक्स मोटारसायकल (एमएच-२८ बीव्ही-३९०१)
Realme 14 Pro Plus मोबाईल (₹५,००० किंमतीचा) जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार नारायण चापले करीत आहेत.

या घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेकांनी शहरातील “प्रेम कॅफें”वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनीही पालकांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हे पण वाचा.

शेतीच्या वादातून रक्तरंजित हल्ला! नागापूर-डोणगावदरम्यान तुफान राडा — एक ठार, अनेक जखमी

पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; युवक काँग्रेस शहराध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल, चिखलीत खळबळ.

नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन करत प्रशासनाला अशा ठिकाणांना परवानगी देताना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

“अशा आणखी स्थानिक बातम्यांसाठी आमचे पेज फॉलो करा — सत्य, जबाबदार आणि थेट बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू!”

 महाराष्ट्रातील स्थानिक घडामोडींचे सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह अपडेट्स मिळवा 👉 Kattanews.in ला FOLLOW करा ✅

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा मृत्यू आणि पादचारी गंभीर जखमी

मोताळ्यात दुचाकीचा भीषण अपघात; नगरसेविकेच्या मुलाचा जागीच मृत्यू व पादचारी गंभीर जखमी.

तांदुळवाडी येथे बँक मॅनेजरच्या घरातील मोठी घरफोडी – ६ लाखांचा ऐवज चोरी

साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तांदुळवाडीत बँक मॅनेजरच्या घरात मोठी चोरी; ६ लाखांचा ऐवज रातोरात गायब.

दुसरबीड–सिंदखेड राजा भीषण अपघातात सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली मृत्यू

दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरून पडलेल्या सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू.

आमदार अमित झनक वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर विधानसभेत आवाज उठवत आहेत

वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नासाठी आमदार अमित झनक यांचा विधानसभेत ठाम आवाज.

देऊळगाव राजा अपघात घटनास्थळाचे चित्र – महिला मजूर ठार आणि पाच जखमी

कामाच्या शोधात आलेल्या कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांवर काळाची झडप; देऊळगाव राजातील भीषण अपघातात 2 महिला ठार

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमण – वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

Leave a Comment

WhatsApp Join Group!