हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणार सरोवरात नेमकं काय घडतंय? पाण्याची रहस्यमय वाढ, उत्तर अजूनही शून्य.

On: December 16, 2025 1:14 PM
Follow Us:
लोणार सरोवरातील पाण्याची वाढ आणि पाण्याखाली गेलेले कमळजा देवी मंदिर
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

लोणार प्रतिनिधी / विनायक कुटे

लोणार सरोवर हे जगप्रसिद्ध आणि वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र सध्या लोणार सरोवर पाण्याची वाढ ही मोठी चिंता बनली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लोणार सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून, यामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा धोक्यात आला आहे. लोणार सरोवर पाण्याची वाढ नेमकी कशामुळे होतेय, याबाबत अद्याप ठोस उत्तर मिळालेले नाही.

सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी उल्कापातातून निर्माण झालेले हे खाऱ्या व क्षारीय पाण्याचे सरोवर आज गंभीर संकटात सापडले आहे. सरोवराच्या काठावरील कधीही पाण्याखाली न गेलेले कमळजा देवीचे प्राचीन मंदिर तब्बल १५ फूट पाण्याखाली गेले असून, ही बाब अत्यंत धक्कादायक मानली जात आहे.

यापूर्वी लोणार सरोवरात मासे आढळल्याने देश-विदेशातील शास्त्रज्ञ अचंबित झाले होते. खाऱ्या व क्षारीय पाण्यात मासे कसे टिकतात, तसेच पाण्याची पातळी अचानक एवढी का वाढते आहे, हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. या रहस्यमय बदलांमुळे लोणार सरोवराचे वैज्ञानिक महत्त्व आणखी वाढले आहे.

सरोवराच्या चारही बाजूंनी असलेली हेमाडपंथी मंदिरे, जैवविविधता आणि जागतिक वारशाचा दर्जा लाभलेले हे सरोवर हळूहळू धोक्यात येत असताना, संबंधित प्रशासन, पुरातत्व विभाग आणि शासन यांची भूमिका मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तातडीने सखोल वैज्ञानिक संशोधन, पाण्याच्या स्त्रोतांचा शोध, जलव्यवस्थापन आणि संरक्षणात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या नाहीत, तर लोणार सरोवराचा अनमोल वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा प्रश्न केवळ लोणारपुरता मर्यादित नसून तो जागतिक पर्यावरणीय चिंतेचा विषय ठरत आहे.


📢 तुमचं मत काय?

लोणार सरोवरातील पाण्याची वाढ ही नैसर्गिक आहे की मानवनिर्मित?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही बातमी शेअर करून अधिक लोकांपर्यंत पोहोचवा.

Kattanews.in वर अशाच महत्त्वाच्या, सखोल आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.


🔗 Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment