लोणार, बुलढाणा | विनायक कुटे
Rare Opportunity म्हणून ओळखला जाणारा ‘खगोल दर्शन महोत्सव 2026’ आता पर्यटकांसाठी खुला झाला आहे. 24 ते 26 एप्रिल दरम्यान लोणार सरोवर येथे आयोजित या Big Astro Event मुळे महाराष्ट्रात ‘Astro Tourism’ ला मोठी चालना मिळणार आहे. ‘डार्क स्काय’ उपक्रमामुळे पर्यटकांना आकाशगंगा, तारे आणि ग्रहांचे LIVE निरीक्षण करण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
या Exclusive Festival अंतर्गत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘Star Gazing’ सत्रे घेण्यात येणार आहेत. यामध्ये नक्षत्र, ग्रह आणि आकाशातील विविध खगोलीय घटना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि नैसर्गिक अंधाराचे महत्त्व यावर आधारित विशेष प्रदर्शन आणि माहितीपटही दाखवले जाणार आहेत.
हा महोत्सव पर्यटन मंत्री शंभुराज देसाई आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आणि MTDC चे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
‘Astro Tourism’ आणि निसर्ग संवर्धन यांची सांगड घालत लोणारला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या Power Packed Event मुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, पर्यटकांसाठी एमटीडीसी निवास, तारांगण, प्रयोगशाळा आणि योग केंद्र अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, या महोत्सवामुळे शाश्वत पर्यटनाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना या Must Visit Event मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
👉 Related News
- धक्कादायक! ‘तु लय माजला का?’ म्हणत लोखंडी दातड्याने युवकावर हल्ला; रिसोडमध्ये खळबळ
- ४ वर्षांनंतर उलगडला थरार! मेहकरमध्ये मिसिंग केसचा खून म्हणून धक्कादायक उलगडा, २ आरोपी अटकेत
- साखरखेर्डा जिजामाता विद्यालयात शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्याचे डोके डेस्कवर आपटले
📢 हे आवश्यक करा..
👉 अशा Breaking News आणि Trending Updates साठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
👉 ही बातमी शेअर करा आणि इतरांनाही या अद्भुत खगोल महोत्सवाची माहिती द्या.










