Ladki Bahin Yojana e-KYC Update 2025 — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून महत्वाचं अपडेट समोर आलं आहे.या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 चा लाभ मिळतो, पण आता e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख ठरवण्यात आली असून, त्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाभ मिळणं थांबू शकतं.चला जाणून घेऊया Ladki Bahin Yojana e-KYC Last Date, प्रक्रिया आणि महत्वाची माहिती.
राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) —महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 चा लाभ दिला जातो.मात्र, सरकारनं या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी आता e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी त्यांच्या X (Twitter) अकाऊंटवरून ट्विट करत म्हटलं आहे की,
“लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमितपणे मिळावा यासाठी e-KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सर्व पात्र महिलांनी 18 नोव्हेंबरपूर्वी e-KYC पूर्ण करावी.”
त्यांनी पुढे सांगितले की, ही सुविधा https://ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.आतापर्यंत लाखो महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली असून, उर्वरित लाभार्थ्यांनी वेळेत e-KYC करणं आवश्यक आहे.

e-KYC प्रक्रिया कशी कराल? (Step-by-Step Guide)
1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या 👉 ladkibahin.maharashtra.gov.in
2. तुमचा Aadhaar नंबर व मोबाईल क्रमांक टाका
3. Send OTP वर क्लिक करून OTP टाका
4. आवश्यक माहिती भरून Declaration स्वीकारा
5. शेवटी “Success – तुमची e-KYC पडताळणी पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल
हेही वाचा.
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या महिलांची नावे यादीतून वगळली – तुम्ही आहात का ?
e-KYC केली नाही तर काय होईल?
जर लाभार्थी महिलांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही,तर त्यांना पुढील महिन्यापासून ₹1500 चा हप्ता मिळणार नाही.म्हणून सर्व पात्र महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं अत्यावश्यक आहे.










