हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

क्षणात होत्याचे नव्हते… खामगाव-अकोला महामार्गावर ट्रकच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

On: January 21, 2026 8:18 AM
Follow Us:
खामगाव-अकोला महामार्गावर ट्रकच्या धडकेत कारचा भीषण अपघात
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

खामगाव |२१ जानेवारी २०२६

खामगाव-अकोला महामार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एकाच क्षणात आनंदावर विरजण घातले. भरधाव ट्रकने कारला मागून धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा खामगाव अपघात सुदर्शन ढाब्याजवळ १९ जानेवारीच्या रात्री घडला. मृतक व जखमी हे खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बर्डे प्लॉट येथील इकबाल खान उर्फ राजू कासम खान, शेख समीर शेख अनिस, नाफे खान वकार खान आणि मोहम्मद फैजान मोहम्मद निसाद हे चौघेजण एम.एच. ०४ डब्ल्यू ७५५२ क्रमांकाच्या इनोव्हा कारने अकोल्याकडे जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या जी.जे. १३ ए.टी. ८७७७ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने ओव्हरटेक करताना कारला जोरदार धडक दिली.

धडकेचा जोर इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात शेख समीर शेख अनिस या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी इकबाल खान आणि नाफे खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

जखमी तिघांना तातडीने खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने दोघांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

खामगाव-अकोला महामार्गावर सातत्याने होणारे अपघात, भरधाव वाहने आणि ओव्हरटेकची स्पर्धा यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.


🚨 KattaNews.in वर ताज्या बातम्यांसाठी आम्हाला Follow करा

अशाच ब्रेकिंग, स्थानिक आणि वास्तव बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.


🔗 Related News

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment