हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भरधाव टिप्परची धडक, जाब विचारताच लोखंडी रॉडने हल्ला; देऊळगाव राजातील धक्कादायक घटना

On: January 20, 2026 7:35 AM
Follow Us:
Deulgaon Raja tipper accident and iron rod attack on bike rider

देऊळगाव राजा |२० जानेवारी २०२६

देऊळगाव राजा तालुक्यात भरधाव टिप्पर अपघात आणि त्यानंतर झालेल्या लोखंडी रॉड हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. निष्काळजीपणे टिप्पर चालवत दुचाकीस्वारास कट मारून जखमी करण्यात आले. अपघातानंतर जाब विचारताच टिप्पर चालकाने थेट लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्याची गंभीर घटना १६ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल दत्तात्रय देशमुख (वय २६, रा. मंडपगाव, ता. देऊळगाव राजा) हे दुचाकी क्रमांक एमएच २८ एफ ८६६२ ने घरी जात असताना सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास मंडपगाव हद्दीत हा प्रकार घडला.

आरोपी पंकज संजय कदम (रा. मंडपगाव) याने त्याच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी ७८६४ भरधाव व निष्काळजीपणे चालवत फिर्यादीच्या दुचाकीस कट मारला. त्यामुळे गोपाल देशमुख हे रस्त्यावर पडून जखमी झाले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

अपघातानंतर जाब विचारताच आरोपीने संतापाच्या भरात लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करत गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही आरोपीने ढकलाढकली करत त्यांचे कपडे फाडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देऊळगाव राजा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


👉 अशीच ताज्या गुन्हेगारी आणि स्थानिक बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.


संबंधित बातम्या

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment