हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

केसापूरमध्ये विहिरीत एक तरूण बुडाल्याची धक्कादायक घटना; गावात खळबळ

On: December 21, 2025 6:16 AM
Follow Us:
केसापूर येथे शेतातील विहिरीत तरूण बुडाल्याची धक्कादायक घटना – बुलढाणा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलढाणा प्रतिनिधी (भागवत गायकवाड) :

केसापूर विहिरीत तरूण बुडाल्याची घटना बुलढाणा तालुक्यातील केसापूर येथे घडली असून या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
आज 20 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास
केसापूर विहिरीत तरूण बुडाल्याची घटना समोर आली.
या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गजानन शिवाजी चव्हाण हे राजू चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विहिरीत बुडाल्याची घटना घडून अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ झाला असल्याची माहिती आहे.

हे पण वाचा…

‘ऑन ड्यूटी’ पोलिसावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला! कर्तव्यावर जातानाच बेदम मारहाण; बुलढाणा बसस्थानक हादरले.

घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सोळंके हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस पथकाकडून विहिरीत बुडालेल्या तरूणाचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

या घटनेनंतर केसापूर गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले असून सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रायपूर पोलीस करत आहेत.

🔔 ताज्या स्थानिक बातम्यांसाठी

बुलढाणा जिल्ह्यातील अशाच ताज्या, विश्वासार्ह व ब्रेकिंग बातम्यांसाठी
Kattanews.in ला नियमित भेट द्या व Follow करा.

📰 हे पण वाचा…


 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment