हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जनगणना 2027 तयारीला वेग; रिसोड तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न

On: December 26, 2025 7:33 AM
Follow Us:
जनगणना 2027 संदर्भात रिसोड तहसील कार्यालयात तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आढावा बैठक
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड | प्रतिनिधी : नारायणराव आरू पाटील

जनगणना 2027 च्या अनुषंगाने रिसोड तालुक्यातील प्रशासकीय तयारीला वेग आला असून,
जनगणना 2027 साठी प्रगणक नेमणूक प्रक्रिया व
जनगणना 2027 अंमलबजावणीच्या दृष्टीने आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी
तहसील कार्यालय रिसोड येथे आढावा बैठक पार पडली.

सदर बैठक मा. प्रतीक्षा तेजनकर, तहसीलदार रिसोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस ग्राम पंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, नायब तहसीलदार महसूल तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी जनगणना 2027 साठी आवश्यक असलेले संपूर्ण नियोजन,
प्रगणकांची भूमिका, क्षेत्रनिहाय कामकाज, वेळापत्रकाचे काटेकोर पालन व जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

निवासी नायब तहसीलदार यांनी प्रगणकांनी प्रत्यक्ष कामकाज करताना करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली.
जनगणना प्रक्रियेत अचूक व विश्वासार्ह माहिती संकलन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जनगणना ही राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची प्रक्रिया असल्याने ती शिस्तबद्ध, नियोजित व वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे,
असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच महसूली वसुली 2025-26 संदर्भातही प्रशासनाने सतर्कता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

👉 आपल्या भागातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews.in ला दररोज भेट द्या

स्थानिक प्रशासन, राजकारण, अपघात, गुन्हे व ग्रामीण भागातील सर्व अपडेट्स सर्वात आधी वाचण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा.

संबंधित बातम्या


 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment