हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भक्तांनी श्रद्धेने दिलेले दानही सोडले नाही; मंदिरातील दानपेटी फोडणारा ४८ तासांत जेरबंद

On: August 11, 2026 7:46 PM
Follow Us:
जानेफळ नागेश्वर महादेव मंदिर चोरी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ४८ तासांत जेरबंद केले
जानेफळ |कट्टा न्यूज नेटवर्क  

देवाच्या चरणी श्रद्धेने अर्पण केलेले दानही चोरट्यांनी सोडले नाही. मोळी येथील नागेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या वस्तू आणि इतर साहित्य चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, जानेफळ पोलिसांनी या चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपीकडून सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवचंद्र मोरेश्वर संस्थानचे अध्यक्ष संदीप महादेव नागरिक यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट रोजी जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७०/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंदिरातील दानपेटी फोडून चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांकडूनही माहिती घेण्यात आली. या तपासातून पोलिसांना सावत्रा येथील भीमराव माधव गवई याच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला निष्पन्न करून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिसांनी आरोपीकडून १८ हजार ९८४ रुपयांची रोख रक्कम, विविध चलनी नोटा व नाणी, चोरीसाठी वापरलेले दोन मोबाईल फोन, दानपेटीत अर्पण केलेला अंदाजे १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नाग, १ ग्रॅम वजनाचा चांदीचा नाग, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि दानपेटी फोडण्यासाठी वापरलेले लोखंडी दोन गज असा एकूण १ लाख ९८४ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दरम्यान, तपासात मुख्य आरोपीने त्याच्यासोबत दोन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांचाही सहभाग असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

या कारवाईत ठाणेदार शरद माळी, संतोष जाधव, पोहेकॉ मोहन सावंत, पोकॉ भागवत पाटोळे, माधव काळे, कृष्णा निकम आणि प्रदीप सौभाग्य यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मंदिरातील चोरीसारख्या संवेदनशील गुन्ह्याचा अवघ्या ४८ तासांत तपास लावून आरोपीला जेरबंद केल्याने जानेफळ पोलिसांच्या तपासाची परिसरात चर्चा होत आहे. चोरीस गेलेला मुद्देमालही मोठ्या प्रमाणात परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करास्थानिक घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवा.👉 WhatsApp Group Join करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजा शेतकरी नुकसान भरपाई निवेदन देताना डॉ. शशिकांत खेडेकर आणि पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

वीज नाही म्हणून पीक जळालं तरी मदत मिळणार? सिंदखेडराजा शेतकरी नुकसान भरपाईचा मोठा निर्णय होणार का?

बुलढाणा सिंदखेडराजा बारलिंगा शिवारातील तणनाशकाने उद्ध्वस्त झालेले कापूस पीक

कुणाचा एवढा आकस? बारलिंग्यात रातोरात तणनाशक फवारून शेतकऱ्याचा ३ एकर कापूस उद्ध्वस्त; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी

बुलढाणा जिल्ह्यात FFS प्रणाली अंतर्गत खत खरेदी करताना शेतकरी

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बुलढाणा जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून खत विक्रीची नवी FFS प्रणाली; DAP २ तर युरिया ५ बॅगची कमाल मर्यादा

डोणगाव FDA कारवाई चिंतामणी दूध डेअरी नमुने जप्त

मेहकर तालुक्यातील डोणगावात FDA ची अचानक धाड; चिंतामणी दूध डेअरीतून दूध आणि खव्याचे नमुने ताब्यात

साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालय शासन निर्णय GR

साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालय अखेर सुरू होणार, महाराष्ट्र शासनाचा निर्णय, नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण

सिंदखेडराजात बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा! सिंदखेडराजात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रस्ता रोको आंदोलन

Leave a comment