हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धाडमधील दोन सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा मोठा दणका; दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

On: August 11, 2026 7:27 AM
Follow Us:
धाडमधील दोन गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
धाड | बुलढाणा : भागवत गायकवाड 

धाड पोलिस स्टेशनच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांच्या नोंदीत असलेल्या दत्तात्रय ऊर्फ उमेश दीपक चिंचोले आणि प्रभाकर दामोधर वैद्य या दोघांवर पोलिसांनी मोठी प्रतिबंधक कारवाई केली आहे. दोघांनाही बुलढाणा जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून, ही कारवाई 9 ऑगस्ट 2026 पासून लागू करण्यात आली आहे.

धाड पोलिस स्टेशनच्या हद्दीत सराईतपणे गुन्हे करणाऱ्या इसमांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार दत्तात्रय ऊर्फ उमेश दीपक चिंचोले, वय 28 वर्षे, रा. धाड, ता. जि. बुलढाणा आणि प्रभाकर दामोधर वैद्य, वय 28 वर्षे, रा. धाड, ता. जि. बुलढाणा यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 55(1) अंतर्गत हद्दपार प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

सदर प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा यांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या कार्यालयात सादर करण्यात आला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधितांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला. त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे, त्यांच्याविरोधात वेळोवेळी करण्यात आलेली कारवाई तसेच त्याचा सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेवर होणारा परिणाम यांचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी दोघांना बुलढाणा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधितांवर यापूर्वी विविध गुन्हे दाखल झाले असून, त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. धाड गाव आणि परिसरात त्यांच्या कथित गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सामान्य नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येण्यासही धजावत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन दोघांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. धाड पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे करून शांतता भंग करणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींविरोधात यापुढेही कठोर प्रतिबंधक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गरज पडल्यास हद्दपार तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

📲 बुलढाणा आणि धाड परिसरातील ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे WhatsApp चॅनेल Follow करा.

👉 WhatsApp चॅनेलवर Follow करा

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक नितिनसिंह चौहान, सफौ. प्रभाकर लोखंडे, पोलीस हवालदार रविंद्र बऱ्हाटे, पोलीस हवालदार श्रीकृष्ण चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल भगवान खमाटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया गोमलाडू तसेच धाड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार संजय भुजबळ यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

टीप : या वृत्तातील गुन्हेगारीसंबंधी उल्लेख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आहेत. संबंधित व्यक्तींवरील आरोपांचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत होऊ शकतो.

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा शासकीय धान्य गोदामात मक्याच्या पोत्यांची थप्पी कोसळल्याची घटना

धान्याच्या पोत्यांची थप्पी अचानक कोसळली; दोन हमाल दबले, एकाचा पाय मोडला! साखरखेर्डा गोदामातील दुर्घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

राहुल रामदास वरवंडे यांची शिवसेना उपशहर प्रमुख पदावरून हकालपट्टी

पक्षविरोधी कारवायांचा ठपका; राहुल वरवंडे यांची शिवसेना उपशहर प्रमुख पदावरून हकालपट्टी

चिखली तालुक्यात पत्नीच्या हाताला गरम सळईचा चटका दिल्याचा आरोप

ज्या हाताने जेवण वाढले, त्याच हाताला गरम सळईचा चटका; चिखली तालुक्यात धक्कादायक घटना

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

खामगाव येथील कार्यक्रमात मोहन भागवत आणि आमदार अंबादास दानवे

भागवतांच्या कार्यक्रमात अंबादास दानवेंची उपस्थिती; भाजप नेत्यांसोबत सहभोजनाने राजकीय चर्चांना उधाण

बुलढाणा जिल्ह्यातील 34,855 शेतकऱ्यांच्या खात्यात 295.47 कोटी रुपये जमा

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 34,855 खात्यांत 295.47 कोटी रुपये जमा

Leave a Comment