हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

कोराडी प्रकल्पाच्या खदाणीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; देऊळगाव माळी परिसरावर शोककळा

On: August 9, 2026 11:26 AM
Follow Us:
कोराडी प्रकल्पाच्या खदाणीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

मेहकर |समाधान सरकटे 

तालुक्यातील देऊळगाव माळी गावाजवळील कोराडी प्रकल्प परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पाय धुण्यासाठी पाण्याजवळ गेलेल्या दोन चिमुकल्यांचा खोल खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने देऊळगाव माळी आणि लोणार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयान राजू शेख (वय अंदाजे १० वर्षे, रा. देऊळगाव माळी) आणि त्याचा मावस भाऊ आवेद इब्राहिम शेख (वय अंदाजे ११ वर्षे, रा. लोणार) हे शेख आसिफ शेख हुसेन यांच्यासोबत कोराडी धरण परिसरात आले होते.

धरणाच्या पाण्यालगत पाणीपुरवठ्यासाठी अंदाजे १५ बाय ४५ आकाराची खदान खोदण्यात आली आहे. या खदाणीत धरणाचे पाणी साचलेले असून पाण्याची खोली वरून सहज लक्षात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पाय धुण्यासाठी गेलेल्या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते अचानक खोल पाण्यात बुडू लागले.

खदाणीत आतून कपार असल्याने परिस्थिती आणखी धोकादायक बनली. मुलांना वाचविण्यासाठी शेख आसिफ शेख हुसेन यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्यासोबत असलेल्या एका मुलीला वाचविण्यात यश आले; मात्र आयान आणि आवेद ही दोन्ही मुले पाण्यात बुडाली.

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी पाण्यात उतरून दोन्ही मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र खदाणीत पाणी अत्यंत खोल असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण झाले.

घटनास्थळी पोलीस कर्मचारी, मंडळ अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ दाखल झाले असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफच्या विशेष पथकालाही घटनेची माहिती देण्यात आली. मात्र रात्रीच्या अंधारामुळे शोधमोहीम राबविण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने सकाळी घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू करण्यात येईल, अशी माहिती पथक प्रमुखांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे देऊळगाव माळी परिसरात शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धरण, तलाव आणि पाणी साचलेल्या खदाणींच्या परिसरात लहान मुलांनी जाताना पालकांनी विशेष काळजी घ्यावी, अशी गरज या घटनेनंतर पुन्हा अधोरेखित झाली आहे.

📲 मेहकर, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी Katta News WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये Join करा

हे पण वाचा..

तुमच्या परिसरातील महत्त्वाची बातमी, फोटो किंवा व्हिडिओ Katta News पर्यंत पोहोचवा. स्थानिक घडामोडींच्या ताज्या आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी Katta News सोबत जोडलेले रहा.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर पंचायत समिती माहिती अधिकार कारणे दाखवा नोटीस

माहिती अधिकाराच्या आदेशाची पायमल्ली? मेहकर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाची कारणे दाखवा नोटीस

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचे पथसंचलन

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; पथसंचलनातून दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

सहकार्य गणेश मंडळ चिखली यांच्या वतीने वृक्षवाटप व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम

सहकार्य गणेश मंडळ चिखलीचा सामाजिक उपक्रम १०१ वृक्षांचे वाटप, २१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन

राहुल बोंद्रे संजय गायकवाड बुलढाणा राजकारण वाद

राहुल बोंद्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचा मोठा दावा; “तक्रारींचा पाढा वाचत त्यांना पक्षप्रवेशासाठी मेटाकुटीला आणले”

रायपूर भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी

रायपूरच्या भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करा; कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

"श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन"

श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न

Leave a Comment