हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

प्रजासत्ताक दिनी जालन्यात पत्रकारांना पोलीसांकडून धक्का-बुक्की; पंकजा मुंडेंच्या पत्रकार परिषदेला पत्रकारांचा बहिष्कार

On: January 28, 2026 7:56 PM
Follow Us:
प्रजासत्ताक दिनी जालना येथे पत्रकारांना पोलीसांकडून धक्का बुक्की
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

जालना | २८ जानेवारी २०२६

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर पोलीसांकडून धक्का-बुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार जालना येथे समोर आला आहे. जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणासाठी जालना येथे उपस्थित होत्या.

ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काही टीव्ही व डिजिटल माध्यमांचे पत्रकार व्हिडिओ चित्रीकरण करत असताना पोलीसांकडून त्यांना अडवण्यात आले. यावेळी पोलिसांनी थेट धक्का-बुक्की केल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. हा प्रकार प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी घडल्याने माध्यम क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पत्रकारांवर झालेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ उपस्थित पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत या पत्रकार परिषदेला बहिष्कार टाकला.

“पत्रकारांवर झालेल्या अन्यायाला जाहीरपणे माफी मागितल्याशिवाय आम्ही कोणतीही पत्रकार परिषद कव्हर करणार नाही,” अशी ठाम भूमिका पत्रकारांनी घेतली. परिणामी पत्रकारांचा रोष पाहता पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद न घेता काढता पाय घेतला.

या घटनेमुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

👉 तुमचं मत काय आहे?
पत्रकारांवर झालेल्या या प्रकारावर तुम्ही काय म्हणता? खाली कमेंट करून प्रतिक्रिया द्या आणि ही बातमी शेअर करा.

 

संजीव पाटील

संजीव पाटील हे २० वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले पत्रकार असून महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व सार्वजनिक घडामोडींचे राज्यभरातून वार्तांकन करतात. नागरिकांचे प्रश्न आणि प्रशासनाशी संबंधित घडामोडी तथ्याधारित व विश्वासार्ह पद्धतीने मांडणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment