हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

On: August 10, 2026 3:51 PM
Follow Us:
हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
बुलढाणा | भागवत गायकवाड 

देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी देशभरात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातही हे अभियान उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि व्यापक लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

अभियानाच्या नियोजनासाठी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement
🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ अभियान
कालावधी : ९ ते १७ ऑगस्ट
जिल्हा : बुलढाणा

जिल्हाधिकारी कार्यालयात विभागप्रमुखांची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नगर विकास विभागाचे जिल्हा सह आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

बैठकीत ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ समर्पित करण्यात आले आहे. या निमित्ताने जिल्हाभर विविध देशभक्तीपर कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

यामध्ये सामूहिक वंदे मातरम् गायन, प्रभात फेऱ्या, बाइक रॅली, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध जनजागृती उपक्रमांचा समावेश आहे. प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विविध स्तरांवर प्रभावी जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वजाचा सन्मान, त्याचा योग्य वापर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध स्पर्धा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची प्रभावी आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.

तसेच अभियानाच्या कालावधीत भारताच्या ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

📲 KattaNews WhatsApp ग्रुप जॉईन करा

बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

हे पण वाचा

ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवा.

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment