हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेलसुरच्या सुपुत्राला कर्तव्यावर वीरमरण; हवालदार हरिदास कापसे यांचे उत्तराखंडमध्ये निधन

On: August 9, 2026 6:58 AM
Follow Us:
बुलढाण्याचे सुपुत्र हवालदार हरिदास कापसे यांना उत्तराखंडमध्ये वीरमरण

बुलढाणा, प्रतिनिधी : भागवत गायकवाड

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. शेलसुरचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना उत्तराखंडमधील अतिउंचावरील दुर्गम भागात कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच शेलसुरसह चिखली तालुका आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

हवालदार हरिदास कापसे हे मूळचे शेलसुर, ता. चिखली, जि. बुलढाणा येथील रहिवासी होते. सध्या त्यांचे कुटुंब चिखली शहरातील दांडे ले-आऊट परिसरात वास्तव्यास आहे. ते भारतीय सैन्य दलाच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (BEG) मधील ४११ (स्वतंत्र) पॅरा फील्ड कंपनी, आग्रा येथे कार्यरत होते.

सध्या त्यांची नियुक्ती उत्तराखंड राज्यातील अतिउंचावरील सीमावर्ती भागात होती. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानक प्रकृतीचा त्रास जाणवला.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी कर्तव्यावर तैनात असताना हवालदार हरिदास कापसे यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्रास जाणवू लागल्याने ते स्वतः चालत जवळील मेडिकल रूममध्ये गेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर प्रकृती काहीशी सामान्य वाटल्याने त्यांनी पुन्हा आपल्या कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते अचानक खाली कोसळून बेशुद्ध झाले.

घटना लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने पुन्हा वैद्यकीय कक्षात हलवले. सैनिकी डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

देशाच्या सेवेसाठी हजारो किलोमीटर दूर, अतिउंच आणि दुर्गम भागात कर्तव्य बजावत असलेल्या आपल्या सुपुत्राच्या निधनाची बातमी कुटुंबीयांना मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त होत आहेत.

हवालदार हरिदास कापसे यांच्या निधनाची बातमी शेलसुर आणि चिखली परिसरात समजताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्याने आपला एक सुपुत्र गमावला आहे.

त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आलेल्या दुःखात शेलसुर, चिखली तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक सहभागी आहेत. हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

📲 KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

बुलढाणा, चिखली आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये आत्ताच सामील व्हा.

👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

तुमची प्रतिक्रिया काय?

देशसेवेत प्राण गमावलेल्या हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना श्रद्धांजली अर्पण करा आणि ही बातमी आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सहकार्य गणेश मंडळ चिखली यांच्या वतीने वृक्षवाटप व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम

सहकार्य गणेश मंडळ चिखलीचा सामाजिक उपक्रम १०१ वृक्षांचे वाटप, २१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन

राहुल बोंद्रे संजय गायकवाड बुलढाणा राजकारण वाद

राहुल बोंद्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचा मोठा दावा; “तक्रारींचा पाढा वाचत त्यांना पक्षप्रवेशासाठी मेटाकुटीला आणले”

रायपूर भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी

रायपूरच्या भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करा; कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

"श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन"

श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न

चिखली गांजा जप्त कारवाईत बुलढाणा पोलिसांनी जप्त केलेला गांजा आणि अटक करण्यात आलेला आरोपी

चिखलीत २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त; एकाला अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत पोलिसांची कारवाई

राहुल बोंद्रे भाजप प्रवेशावर श्वेता महाले यांची टीका — बुलढाणा राजकारण

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशावर श्वेता महाले यांचा मोठा दावा; “जनतेने दोनदा घरी बसवलेल्या व्यक्तीला घेऊन काय फायदा? भाजपने अधिकृत तारीखच दिली नव्हती!”

Leave a Comment