हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 34,855 खात्यांत 295.47 कोटी रुपये जमा

On: August 10, 2026 11:47 AM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यातील 34,855 शेतकऱ्यांच्या खात्यात 295.47 कोटी रुपये जमा
बुलढाणा |समाधान सरकटे 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील 34 हजार 855 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल 295.47 कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या पात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील एकूण 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर 5,029 कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

बुलढाणा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 1 लाख 15 हजार 516 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 85 हजार 453 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. मात्र अजूनही 30 हजार 63 पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे.

ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन हे प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ टप्प्याटप्प्याने त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

तांत्रिक अडचणींमुळे आधार प्रमाणीकरण करता आले नसलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा किंवा तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.

📢 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

बुलढाणा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा.

👉 WhatsApp ग्रुप Join करा

खरीप पीक कर्जासाठीही महत्त्वाचे निर्देश

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना चालू हंगामासाठी तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने बँकांना दिले आहेत. त्यामुळे कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना नव्याने शेतीच्या खर्चासाठी आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे.

चालू खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी आवश्यक नियोजन पूर्ण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांमध्ये अनावश्यक गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी केले आहे.

दरम्यान, आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्रतेनुसार कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

📌 महत्त्वाचे: बुलढाणा जिल्ह्यातील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे, त्यांनी जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन प्रमाणीकरण पूर्ण करावे.

तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे का?

Kattanews वरील ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. बातमी आवडली असल्यास WhatsApp आणि सोशल मीडियावर शेअर करा.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

कोराडी प्रकल्पाच्या खदाणीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

कोराडी प्रकल्पाच्या खदाणीत बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; देऊळगाव माळी परिसरावर शोककळा

बुलढाण्यात काजूकतलीमध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याची तक्रार

काजूकतलीचा बॉक्स उघडताच धक्का! बुरशीच्या थरात चक्क जिवंत अळ्या; बुलढाण्यात FDA पथकाची रिलायन्स मॉलवर धडक

बुलढाण्याचे सुपुत्र हवालदार हरिदास कापसे यांना उत्तराखंडमध्ये वीरमरण

शेलसुरच्या सुपुत्राला कर्तव्यावर वीरमरण; हवालदार हरिदास कापसे यांचे उत्तराखंडमध्ये निधन

आमदार मनोज कायंदे यांची नितीन गडकरींकडे सिंदखेडराजा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या विकासकामांसाठी मागणी

सिंदखेडराजाच्या विकासकामांसाठी आ. मनोज कायंदे मैदानात; ना. नितीन गडकरींकडे रस्ते-पुलांसाठी निधीची मागणी

शिवनी आरमाळ ग्रामपंचायतीतील निधी व्यवहारावर चौकशीची मागणी

धक्कादायक! पदभार सोडलेल्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीवर ग्रामपंचायतीतून निधीची उचल?; गटविकास अधिकाऱ्याच्या भूमिकेवर प्रश्न

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

Leave a Comment