हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भागवतांच्या कार्यक्रमात अंबादास दानवेंची उपस्थिती; भाजप नेत्यांसोबत सहभोजनाने राजकीय चर्चांना उधाण

On: August 10, 2026 1:41 PM
Follow Us:
खामगाव येथील कार्यक्रमात मोहन भागवत आणि आमदार अंबादास दानवे
खामगाव : भागवत गायकवाड सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत खामगाव येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे मुख्य उद्घाटन सोहळ्यात दानवे हे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यासह आ. संजय कुटे, ना. उईके आणि ना. फुंडकर यांच्यासोबत उपस्थित होते. त्यानंतर विशेष आमंत्रितांच्या भोजनावेळीही दानवे सहभागी झाले. भाजपच्या आमदारांसोबत त्यांनी सहभोजन केल्याने कार्यक्रमस्थळी त्यांच्या उपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

खामगाव येथील डॉ. प. पू. भय्यूजी महाराज प्रणित सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेच्या नवनिर्मित भव्य सभागृहाचा तसेच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा उद्घाटन सोहळा ८ ऑगस्ट रोजी पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत प्रमुख उपस्थित होते.

आश्रमशाळेच्या परिसरात सुमारे १० हजार चौरस फुटांचे भव्य बंदिस्त सभागृह उभारण्यात आले आहे. तसेच तीन क्रीडांगणांचा समावेश असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचीही निर्मिती करण्यात आली आहे. या सुविधांच्या उद्घाटनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमातील आ.अंबादास दानवे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. मुख्य उद्घाटन सोहळ्याच्या वेळी ते सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यासोबत दिसून आले. यावेळी आ. संजय कुटे, ना. उईके आणि ना. फुंडकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर विशेष आमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भोजनावेळीही आ. दानवे उपस्थित होते. त्यांनी इतर मान्यवरांसोबत सहभोजन केले. भाजपच्या आमदारांसोबत त्यांची झालेली ही उपस्थिती कार्यक्रमस्थळी चर्चेचा विषय बनली.

आ. दानवे हे भय्यूजी महाराजांचे भक्त

आ.अंबादास दानवे हे स्वर्गीय प. पू. भय्यूजी महाराजांचे भक्त असल्याचे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर त्यांना सद्गुरुदत्त धार्मिक व परमार्थिक ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. आयुषी देशमुख यांनी कार्यक्रमासाठी आवर्जून निमंत्रित केले होते. त्या निमंत्रणामुळेच दानवे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून देण्यात आली.

दरम्यान, कार्यक्रमातील आपल्या उपस्थितीबाबत माध्यमांनी विचारणा केली असता आ. अंबादास दानवे यांनी “मी सार्वजनिक कार्यक्रम म्हणून उपस्थित राहिलो,” असे उत्तर दिले.

त्यामुळे दानवेंच्या या उपस्थितीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्यापूर्वी त्यांचे स्पष्टीकरणही महत्त्वाचे ठरते. मात्र, शिवसेना उबाठा गटाचे आमदार आणि भाजपचे प्रमुख नेते तसेच सरसंघचालक यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे खामगावच्या राजकीय वर्तुळात या उपस्थितीची चर्चा रंगली आहे.

📲 Katta News WhatsApp ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडी थेट WhatsApp वर मिळवा.


👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

तुमच्या परिसरातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा!

स्थानिक घडामोडी, राजकीय बातम्या किंवा नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित माहिती असल्यास Katta News शी संपर्क साधा.

वाचा • शेअर करा • Katta News सोबत जोडलेले राहा

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्ह्यात FFS प्रणाली अंतर्गत खत खरेदी करताना शेतकरी

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बुलढाणा जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून खत विक्रीची नवी FFS प्रणाली; DAP २ तर युरिया ५ बॅगची कमाल मर्यादा

डोणगाव FDA कारवाई चिंतामणी दूध डेअरी नमुने जप्त

मेहकर तालुक्यातील डोणगावात FDA ची अचानक धाड; चिंतामणी दूध डेअरीतून दूध आणि खव्याचे नमुने ताब्यात

साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालय शासन निर्णय GR

साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालय अखेर सुरू होणार, महाराष्ट्र शासनाचा निर्णय, नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण

सिंदखेडराजात बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

बुलढाणा जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा! सिंदखेडराजात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रस्ता रोको आंदोलन

बुलढाणा राजूर घाटात सापडलेला अनोळखी मृतदेह, पोलीस तपास

बुलढाणा: राजूर घाटात नेमकं काय घडलं? हनुमान मंदिराजवळ दरीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

जानेफळ बँक चोरी सीसीटीव्ही फुटेज

जानेफळच्या SBI बँकेत शेतकऱ्याचे ३५ हजार रुपये लंपास; चोरीचा प्रकार CCTV मध्ये कैद

Leave a comment