हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

कठीण परिश्रम आणि मजबूत ध्येय असेल तर जीवनाचा विकास अटळ! – सहाय्यक आयुक्त दीपक मांटे

Follow Us:
दीपक मांटे जीवन विकास विद्यालय स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण करताना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलढाणा |२७ जानेवारी २०२६

 शालेय व महाविद्यालयीन जीवनात जर संघर्ष सहन केला आणि कठीण परिश्रम केले, तर यश निश्चित मिळते, असे ठाम प्रतिपादन नागपूर विभागाचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक मांटे यांनी केले.बुलढाणा जिल्ह्यातील तिथे राजा तालुक्यातील दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, आत्मविश्वास आणि जीवनमूल्यांचा संदेश देण्यात आला.

 

जीवन विकास विद्यालय, दुसरबीड येथे स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त दीपक मांटे

उद्घाटनीय भाषणात भावनिक होत आयुक्त मांटे म्हणाले, “मी एका सामान्य खेड्यातून आलेला विद्यार्थी आहे. या शाळेने मला घडवले, शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. आज मी जे काही आहे, त्यामागे जीवन विकास विद्यालयाचा मोठा वाटा आहे.”

“या शाळेचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. मात्र शाळा आणि येथील विद्यार्थ्यांसाठी जे काही करता येईल, त्यासाठी मी नेहमी तयार असेन,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. “अभ्यासाच्या दिवसांत जे झोप घेतात, त्यांना आयुष्यभर जाग राहावे लागते; आणि जे अभ्यासाच्या काळात कमी झोपतात, ते आयुष्यभर सुखी राहतात,” असे वास्तववादी विधान त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर बुलढाणा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी जगन मुंडे, प्रसिद्ध व्याख्याते जीवनराव देशमुख (अकोला) उपस्थित होते. जीवनराव देशमुख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून विद्यार्थ्यांना जीवनातील यशाचे अनेक ट्रिक्स सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्था, किनगाव राजा यांचे अध्यक्ष मुकुंदराव देशमुख होते. प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव राजे गणेशराव जाधव यांचा समावेश होता.

प्रास्ताविक प्राचार्य गणेश भांगे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. रवींद्र धनावत, पर्यवेक्षक डी. एल. वायाळ, तंटामुक्त समिती अध्यक्ष छगन खंदारे, राजेश गुंजाळ, बाबुराव खंदारे, कृष्णा जराड, आम्रपाली काळे, डॉ. शिवाजी खरात, माजी प्राचार्य भगवान मस्के, नितीन देशमुख, महिला शिक्षिका प्रतिनिधी मंदाताई हुसे, पत्रकार रमेश कोंडाणे, पत्रकार बाळासाहेब भोसले, माजी प्रा. नरेंद्र पोटोडे, प्रा. प्रभाकर देशमुख यांची उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी NCC परेडद्वारे पथसंचलन केले तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमांतर्गत नृत्य व नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. जे. राजे जाधव यांनी केले.


📌 Related News


👉 Kattanews.in वर अशाच प्रेरणादायी, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

कवी अजीम नवाज राही साखरखेर्डा येथे लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025 निमित्त सत्कार

साखरखेर्डा गावाचा अभिमान! ‘वळीवाच्या वेळा’ कवितासंग्रहासाठी कवी अजीम नवाज राही यांना लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात 632 शिक्षकांवर कारवाई

632 शिक्षकांवर मोठी कारवाई! शालार्थ आयडी घोटाळ्यात नियुक्त्या अवैध; वेतन थांबवून पगार वसुलीचे आदेश

शिवजयंती निमित्त कवी अज़िम नवाज राही यांचा शिवसन्मान

शिवजयंतीनिमित्त कवी अज़िम नवाज राही यांना ‘शिवसन्मान’; उर्दू मातृभाषा असूनही मराठी साहित्यसेवेचा गौरव

आदर्श विवाह सोहळ्यात वधू-वर आणि मान्यवर उपस्थित

बोले तैसा चाले! ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या मुलाचा साधेपणात पार पडलेला आदर्श विवाह चर्चेत

तुषार डोडिया महेश आयडॉल सीझन 14 राष्ट्रीय स्पर्धेत देशातून द्वितीय क्रमांक पटकावताना

राष्ट्रीय पातळीवर बुलढाण्याचा डंका! ‘महेश आयडॉल 14’ मध्ये तुषार डोडिया उपविजेता

वैदुवाडी जि.प. शाळेत बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान घोटाळ्याचा आरोप, चिखली पंचायत समिती

वैदुवाडी जि.प. शाळेत बोगस विद्यार्थी प्रकरण उघड! चौकशी अहवाल दाबला? 420 अंतर्गत कारवाईची मागणी, 23 फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा

Leave a Comment