हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

विकसित भारतासाठी आत्मनिर्भर बुलढाण्याचा संकल्प! – प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे मोठे आवाहन

On: January 27, 2026 9:05 AM
Follow Us:
प्रजासत्ताक दिनी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

बुलढाणा | दि. 26 जानेवारी 

विकसित भारत 2047 च्या दिशेने देश वाटचाल करत असताना ‘आत्मनिर्भर बुलढाणा’ घडवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले.

देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते.

यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता, वीरपत्नी, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.किरण पाटील म्हणाले की, भारत आज जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असण्यासोबतच जागतिक अर्थव्यवस्थेतही महत्त्वाचे स्थान निर्माण करत आहे. महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असून, या विकासयात्रेत बुलढाणा जिल्हाही आत्मविश्वासाने पुढे जात आहे.

शेती, उद्योग, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि डिजिटल सेवा या क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून महात्मा गांधी रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत हजारो हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासन खंबीरपणे उभे असून 429 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. यासोबतच 702 कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.

जिगांव सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन वेगाने सुरू असून हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आयआयटी मुंबईच्या सहकार्याने संशोधन सुरू असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

युवकांना संबोधित करताना डॉ.किरण पाटील म्हणाले की, आजचा युवक नोकरी शोधणारा नाही तर नोकरी देणारा बनू शकतो. स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, अॅग्री-स्टार्टअप्स आणि डिजिटल सेवा क्षेत्रात अपार संधी उपलब्ध आहेत.

डिजिटल प्रशासनाच्या दिशेने ‘महसूल मित्र – व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा’ सुरू करण्यात आली असून नागरिकांना विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी पोलीस परेडची पाहणी करत मानवंदना स्वीकारली. यावेळी विविध विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल आणि त्या विकासगाथेत बुलढाणा जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी व्यक्त केला.


📌 हे‌ पण वाचा 


🗣️ तुमचे मत काय?

आत्मनिर्भर बुलढाण्याच्या या संकल्पाबाबत तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. अशीच स्थानिक, विश्वासार्ह आणि वेगवान बातमी वाचण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हर घर तिरंगा अभियानासाठी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी बुलढाणा जिल्हा सज्ज; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे मोठे आवाहन

साखरखेर्डा येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी

७५ गावांच्या प्रवाशांचा प्रश्न कधी सुटणार? साखरखेर्ड्यात सुसज्ज बसस्थानकासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते अभिनेत्री व पत्रकार किरण वाघ यांना साई प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान करताना

शिर्डीत किरण वाघ यांचा दुहेरी गौरव! ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’

लोणार नगरपरिषदेत घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात निवेदन देताना डॉ. गोपालसिंह बछिरे व शिवसेना उ.बा.ठा. पदाधिकारी

घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव; अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

उत्रादा ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा; ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांचा घेराव, अर्धवट रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

एअरबॅगमुळे 75 वर्षीय वकिलाचा जीव वाचला; मेहकर येथे आयशरच्या धडकेत कारचा चक्काचूर

मेहकरमधील ज्येष्ठ वकिलाच्या कारला भरधाव आयशरची समोरून धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर

Leave a Comment