हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा गावाचा अभिमान! ‘वळीवाच्या वेळा’ कवितासंग्रहासाठी कवी अजीम नवाज राही यांना लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025

On: March 8, 2026 11:07 AM
Follow Us:
कवी अजीम नवाज राही साखरखेर्डा येथे लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025 निमित्त सत्कार

साखरखेर्डा (प्रतिनिधी) ७ मार्च २०२६ 

साखरखेर्डा गावाचे नाव साहित्यविश्वात उजळवणारे प्रख्यात मराठी कवी आणि नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांना त्यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ या गाजत असलेल्या कवितासंग्रहासाठी प्रतिष्ठेचा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा जिव्हाळ्याचा सत्कार करण्यात आला.

साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ठाणेदार गजानन दिगंबरराव करेवाड आणि दुय्यम ठाणेदार संदीप मेंधणे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अजीम नवाज राही यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना ठाणेदार गजानन करेवाड म्हणाले की, अजीम नवाज राही यांच्या लेखणीने आणि वाणीने साखरखेर्डा गावाच्या नावाभोवती मान-सन्मानाचे वलय निर्माण केले आहे. त्यांच्या कवितेत सर्वसामान्य माणसाच्या कष्टाळू जीवनाचे वास्तव चित्रण दिसते आणि त्यांच्या शब्दांत जीवनातील सत्यता स्पष्टपणे उमटते.

सत्काराच्या उत्तरादाखल कवी अजीम नवाज राही यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ज्या साखरखेर्डा गावात माझा जन्म झाला आणि ज्या गावाने मला घडवले त्या गावच्या मातीचा सृजनशील सुगंध माझ्या संपूर्ण शब्दप्रवासात भरून राहिला आहे. गावकऱ्यांचे प्रेम आणि विश्वास मला सतत नवी ऊर्जा देत राहतो. त्यांच्या प्रेमामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही जटील आव्हानांचा सामना करण्याची ताकद मला मिळाली आहे.

याच महिन्यात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 18 फेब्रुवारी रोजी साखरखेर्डा सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने अजीम नवाज राही यांना ‘अमोघ शब्दधन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने झालेला हा सत्कार गावकऱ्यांसाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.

साहित्य, संस्कृती आणि काव्याच्या माध्यमातून साखरखेर्डा गावाचे नाव राज्यभर पोहोचवणाऱ्या अजीम नवाज राही यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


Related News


👉 अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

Leave a Comment