dinvishesh : पृथ्वी सूर्याभोवती फिरत राहते. या परिक्रमेत २० जून रोजी वर्षातला सर्वांत मोठा दिवस राहील. १३ तास १३ मिनिटे या कालावधीचा हा दिवस राहणार असल्याने दिवस मोठा व रात्र लहान राहणार असल्याची माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कलला आहे. या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सर्वांत जास्त सूर्याकडे झुकलेला असतो. त्यामुळे सूर्य जास्तीत जास्त उत्तरेकडे दिसतो. या बिंदूला ‘समर सोल्स्टाइश’ म्हणतात.
या बिंदूवर सूर्य असताना दिवस हा सर्वांत मोठा असतो व रात्र लहान असते. दिवस व रात्रीचा कालावधी कमी जास्त होणे, आपण नेहमीच अनुभवत असतो २० जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायान सुरू होते.सूर्याचे उत्तरायन व दक्षिणायनसुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास उत्तरायन व दक्षिणायन सहज लक्षात येऊ शकते. खगोलप्रेमींनी २० जून रोजी उत्तर गोलार्धातील सर्वांत मोठ्या दिवसाचे कालमापन करावे व सर्वांत मोठ्या दिवसाचा अनुभव घ्यावा