Skip to content
Menu
Offcanvas menu
    Home ताज्या बातम्या Latest crime news : ९ दिवसापूर्वी प्रियकराला वाचवणे बेतले प्रियेसीचा जीवावर !
    Latest crime news
    ताज्या बातम्या

    Latest crime news : ९ दिवसापूर्वी प्रियकराला वाचवणे बेतले प्रियेसीचा जीवावर !

    Byकट्टा न्यूज June 20, 2024June 20, 2024Write a Comment on Latest crime news : ९ दिवसापूर्वी प्रियकराला वाचवणे बेतले प्रियेसीचा जीवावर !

    Latest crime news

    Latest crime news : नालासोपारा Nalasopara  येथील नऊ दिवसांपूर्वी २२ वर्षीय आरती यादवने Arti yadav आरोपी रोहित यादवला आचोळे पोलिसांपासून वाचविले होते. त्याला वाचविण्याचे आरतीच्या जिवावर बेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी रोहितने मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती कामावर जात असताना रस्त्यात गाठून लोखंडी पान्याने १५-१६ वार करून तिची निघृण हत्या केली. आरतीने आचोळा पोलिसांपासून ‘प्रेमसंबंध’ असल्याचे लपवून ठेवत मोबाइलचे प्रकरण मिटवून घेऊ, असे सांगत पोलिसांना कारवाईपासून रोखले नसते, तर कदाचित तिचा जीव वाचला असता.

     

     

    सहा वर्षांपूर्वी संतोष भवन परिसरात आरती आणि रोहित आजूबाजूला राहण्यासाठी आले. तेथूनच दोघांची ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. तीन वर्षांपूर्वी दोघांनी आपल्या घरच्यांना याबाबत सांगून लवकरच लग्न करणार असे सांगितले होते. त्यानंतर आरती यादव ही अलीकडेच संतोष भवन santosh bhavan येथून आचोळ्याच्या शिर्डीनगर परिसरात राहण्यासाठी आली होती. मात्र, महिनाभरापूर्वीच दोघांचेही ब्रेकअप झाले होते.

     

     

    आरतीनेच पोलिसांना कारवाईपासून रोखले

    ■ रोहित तिच्यासोबत बोलण्यासाठी मोबाइलवर फोन करायचा, पण ती उचलत नव्हती. म्हणून ८ जूनला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याने शिर्डीनगर परिसरात येऊन भांडण करत आरतीचा मोबाईल फोडला होता. त्यानंतर हा वाद आचोळा पोलिस ठाण्यात पोहोचला होता.

    ■ पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून ९ जूनला सकाळी हजर राहण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी आरोपीला पोलिसांनी खाक्या दाखविण्यास सुरुवात केल्यावर आरतीने पोलिसांना थांबविले व कारवाई करू नका, म्हणून विनंती केली.

     

     

    आरोपीला पोलिस कोठडी

    नालासोपारा : कामावर जाणाऱ्या आरती यादव हिची सर्वांसमक्ष दिवसाढवळ्ळ्या हत्या करणारा आरोपी रोहित यादव याला बुधवारी वसई सत्र न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वालीव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी आरोपीला बुधवारी दुपारी वसई दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश जी. जे. सुंदर यांच्यापुढे उभे केले. आरोपीला त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यात आले. तेथील न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी दिवाणी न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आणि १० मिनिटांच्या युक्तिवादानंतर आरोपी रोहित यादवला २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

    ती उत्तर प्रदेशची, तो हरियाणाचा

    २२ वर्षीय आरती यादव ही आचोळे रोडवरील शिर्डीनगर परिसरात परिवारासह राहत होती. ती मूळची उत्तर प्रदेशमधील राहणारी होती, तर आरोपी रोहित यादव हा संतोष भवनच्या कारगीलनगर परिसरात राहत होता. तो मूळचा हरियाणातील राहणारा आहे.

    Post Navigation

    dinvishesh | आजचा दिवस सर्वांत मोठा. जाणून घ्या कसा ?

    Previous

    MS Dhoni latest news : फिफाला भावले ‘थाला फॉर अ रिझन’

    Next

    Related Posts

    मेहकर ते लोणार रोडवर काळी पिवळीचा भीषण अपघात.

    July 29, 2024July 29, 2024
    chhatrapati sambhajinagar

    chhatrapati sambhajinagar : आंतरधर्मीय प्रेम विवाह केला म्हणून चाकूने गंभीर वार…

    July 16, 2024July 16, 2024
    rape news

    rape news : धक्कादायक ! दोन चिमुडींवर स्कूल व्हॅन चालकाचा लैंगिक अत्याचार

    October 4, 2024October 4, 2024
    khamgaon news

    khamgaon news : १८ लाखांनी गडविल्या गेल्याने मुख्याध्यापकाची आत्महत्या !

    July 19, 2024July 19, 2024

    Recent Posts

    • रिसोड : सर्व लोक गरजाराची साफसफाई करतात स्वच्छता करतात,मग माझी कोण करणार..? माझा फक्त वापर..
    • Washim : मनमिळावू व्यक्तीमत्व केशव हरणे यांचे निधन.
    • रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी 20 ते 21 उमेदवारांचे अर्ज दाखल..
    • वाशिम मतदार संघात डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी दाखल.
    • वंचित चे उमेदवार प्रशांत वाघोदे हे आज भरणार उमेदवारी अर्ज.

    Recent Comments

    1. A WordPress Commenter on Hello world!

    Archives

    • October 2024
    • September 2024
    • August 2024
    • July 2024
    • June 2024
    • May 2024

    Copyright © 2025 {Kattanews} - Powered by {kattanews}