Maharajganj news : सरकारचे ४० हजार रु येताच गावातील ११ महिला प्रियकरासोबत गेल्या पळून

Maharajganj news

Maharajganj news : उत्तर प्रदेशातील uttar pradesh महाराजगंजमधून  maharajganj  एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच ११ महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरासह पळून गेल्या आहेत. या प्रकरणाची चर्चा होताच प्रशासनाने याचा तपास सुरू करत पैसे माघारी घेण्याची कारवाई सुरू केली आहे.

 

 

 

हे प्रकरण निचलौला ब्लॉक nichloula block येथील आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १०८ गावांमध्ये २,३५० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या लाभार्थ्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. ‘पंतप्रधान आवास योजनेचा’ पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये देण्यात आले होते. मात्र पहिला हप्ता येताच यागावातील ११ महिलांनी घर सोडून प्रियकरासोबत पळ काढला आहे. एका महिलेच्या सासूने सांगितले की, सुनेच्या नावावर पैसे जमा झाल्यानंतर सून पळून गेली. आता अधिकारी येत आहेत. आम्ही गरीब असल्याने पैसे कुठून द्यायचे? या योजनेच्या दुसऱ्या हप्त्यावर बंदी घालण्याची मागणी या महिलांच्या पतींनी पोलिसांकडे केली आहे.