नांदुरा : पोलीस प्रशासनाचा सावळा गोंधळ ; दरोडा प्रकरणातील कुख्यात आरोपी नांदुरा पोलीस स्टेशन मधून फरार

 

नांदुरा

 

 

 

नांदुरा : नारखेड रोडवर २९ सप्टेंबर रोजी घडलेल्या दरोडा प्रकरणी नांदुरा nandura पोलिसांनी बुलढाणा buldhana कारागृहातून ताब्यात घेतलेला कुख्यात आरोपी कविन बाबु भोसले वय २५ रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर हा रविवारी दुपारी नांदुरा पोलिस ठाण्यातून पसार झाला. ही खळबळजनक घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. नांदुरा पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे तपासी अंमलदार हे. कॉ. अनंता वराडे यांनी पोलिस कोठडीतून सदर आरोपीस बाहेर काढून त्याचा जबाब नोंदवला आणि त्याला पुन्हा डी. बी. रुम मधून पोलिस कोठडीत नेत असताना पोलीसांच्या हाताला झटका देऊन पोलिस ठाण्याच्या मागच्या भींतीवरुन उडी घेऊन त्याने पळ काढला.

 

 

 

पोलीसांनी त्याचा पाठलाग केला मात्र ‘ज्ञानगंगा नदीला’ आलेल्या पुरातून जिवाची पर्वा न करता त्याने पोलीसांच्या हातावर तुरी दिल्या. ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री निमगाव नारखेड रोडवर दहा ते बारा जणांनी नागपूर nagpur येथील व्यापारी राजेंद्र कुमार प्रकाशचंद अग्रवाल व त्यांच्या मीत्राला अॅल्युमिनियम व कॉपरचा माल विकणे आहे असे आमीष दाखवून बोलावून घेतले आणि त्यांना मारहाण करून चाकुचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा ९ लाखाचा ऐवज लुटून नेला होता.

 

 

 

या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हे दाखल करून काही आरोपींना अटक केली होती. या घटनेमुळे नांदुरा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. नांदुरा पोलिस ठाण्याचे संपूर्ण पोलिस अधिकारी आणि कर्मचारी त्याला पकडण्यासाठी कामाला लागले. परंतु रात्री उशिरा पर्यंत त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. कुख्यात आरोपी पसार झाल्याची माहिती वरिष्ठांना मीळताच जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, तथा मलकापूर प्रभारी डी वाय एस पी यांनी तातडीने नांदुरा पोलिस ठाण्यात धाव घेऊन घटनेबाबत माहिती घेतली.