हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धामणगाव मंदिरातील दानपेटी चोरीचा छडा; धाड पोलिसांनी दोन तासांत आरोपीला पकडले, ₹७,५०० मुद्देमाल जप्त

On: July 28, 2026 11:04 AM
Follow Us:
धामणगाव मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणात धाड पोलिसांनी आरोपीला पकडले

बुलढाणा | भागवत गायकवाड 

धामणगाव येथील श्री गजानन महाराज साईबाबा संस्थान मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणाचा धाड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावला आहे. पोलिसांच्या तत्पर तपासामुळे चोरीस गेलेली लोखंडी दानपेटी आणि त्यातील रोख रक्कम असा एकूण ₹७,५०० रुपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात यश आले आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या प्रकरणी धामणगाव येथील रहिवासी समाधान छगन पायधन (वय ५९ वर्षे) यांनी धाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून कायमी अपराध क्रमांक ३११/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

📢 ताज्या बातम्यांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, सरकारी योजना, स्थानिक बातम्या आणि ब्रेकिंग अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवा.👉 WhatsApp Group Join करा

गुन्हा दाखल होताच धाड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने तपासाला सुरुवात केली. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध घेतला.

या कारवाईत निलेश गणेश माहाले (वय ३३ वर्षे, रा. धामणगाव, ता. जि. बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याने मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली लोखंडी दानपेटी आणि त्यातील रोख रक्कम हस्तगत केली आहे. यामध्ये लोखंडी दानपेटीची किंमत अंदाजे ₹१,५०० रुपये असून दानपेटीतील रोख रक्कम ₹६,००० रुपये आहे.

एकूण ₹७,५०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी १०० टक्के हस्तगत केला आहे.

धाड पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे मंदिर चोरी प्रकरणाचा अल्पावधीत उलगडा झाला असून परिसरातून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

धाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अजिनाथ मोरे तसेच सहायक फौजदार प्रभाकर लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज मुळे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी पार पाडली.


संबंधित बातम्या

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment