बुलढाणा | भागवत गायकवाड
घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत आरोपीला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचेही उघड झाले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन धाड येथे भारतीय शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा क्र. ३०३/२०२६ नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रवींद्र हजारे करत आहेत.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला आजच जॉईन करा











