हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भरधाव कारची दुचाकीस भीषण धडक; एक गंभीर जखमी, चालकावर गुन्हा

On: February 1, 2026 7:06 PM
Follow Us:
देऊळगाव राजा कार दुचाकी अपघात जालना रोड
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

देऊळगाव राजा |१ फेब्रुवारी २०२६

भरधाव कारने दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास देऊळगाव राजा–जालना मार्गावरील अशोक ढाब्यासमोर घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश रंगनाथ पाटोळे (वय ३८, व्यवसाय – मजुरी, मूळ रा. शिराळा ता. जाफ्राबाद जि. जालना, सध्या रा. शिवाजीनगर, देऊळगाव राजा) हे त्यांच्या एमएच २१ एझेड १४४२ क्रमांकाच्या मोटारसायकलने जालना येथून घरी परत येत होते.

त्याचवेळी त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर (एमएच २८ बीक्यू १९८१) या कारच्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत जोरदार धडक दिली.

या अपघातात प्रकाश पाटोळे हे रस्त्यावर कोसळले असून त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (A) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.


🔗 संबंधित बातम्या


👉 अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.
👉  आम्हाला Follow करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment