हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार! जनरेटर बंद, लाईट गायब; नागरिक दिवसभर हेलपाटे

On: May 8, 2026 9:43 AM
Follow Us:
सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील बंद जनरेटर आणि कामासाठी थांबलेले नागरिक

सिंदखेडराजा | प्रतिनिधी

सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. लाईट नसल्यामुळे संपूर्ण कामकाज ठप्प झाले, तर दुसरीकडे कार्यालयाच्या पाठीमागे उभे असलेले मोठे जनरेटर अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचे वास्तव समोर आले. दूरवरच्या खेड्यापाड्यातून आलेल्या नागरिकांना दिवसभर हेलपाटे मारावे लागले. वृद्ध महिला, शेतकरी, निराधार लाभार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः उन्हात ताटकळत बसावे लागल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक ६ मे रोजी हा प्रकार घडला. सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक विभागांमधील संगणकीय कामकाज पूर्णपणे बंद पडले होते. तहसील कार्यालयात दाखले, प्रमाणपत्रे, महसूल संबंधित कामे, संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभागातील सेवा यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

विशेष म्हणजे, तहसील कार्यालयाच्या परिसरात मोठे जनरेटर उपलब्ध असूनही ते गेल्या तीन ते चार वर्षांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाकडून लाखो रुपये खर्च करून सुविधा उभारण्यात येतात, मात्र त्या प्रत्यक्षात नागरिकांच्या उपयोगात येत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिवसभर लाईट नसल्यामुळे महिला कर्मचारी आपल्या खुर्चीवर बसून कामकाज सांभाळताना दिसत होत्या, तर इतर काही कर्मचारी कार्यालयाबाहेर फिरताना नागरिकांनी पाहिले. अनेक नागरिक तहसील कार्यालयाच्या परिसरात सावली शोधत बसले होते. विशेषतः संजय गांधी निराधार विभागाबाहेर अनेक वृद्ध महिला तासन्तास थांबलेल्या दिसून आल्या.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नव्हती. वाढत्या उन्हामुळे नागरिकांचे हाल होत असताना प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तहसीलदार अजित दिवटे हे त्या दिवशी अधिकृत कामानिमित्त बाहेर दौऱ्यावर असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयातील नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

“सरकारी कार्यालयातच जर जनरेटर बंद आणि कामकाज ठप्प असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे मागायचा?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. येत्या काही दिवसांत प्रशासन जनरेटर दुरुस्त करून नागरिकांची समस्या सोडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kattanews.in ला Follow करा

अशाच स्थानिक, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
तुमच्या परिसरातील बातमी, समस्या किंवा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संपर्क साधा.

 

सचिन खंदारे

सचिन खंदारे हे गेल्या १० वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून स्थानिक प्रशासन, ग्रामीण प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि जनतेच्या मूलभूत समस्यांवरील विश्वासार्ह वार्तांकनासाठी ओळखले जातात. तथ्याधारित माहिती, संतुलित मांडणी आणि क्षेत्रीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी वाचकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment