Advertisement
चिखली (बुलढाणा) | २३ जानेवारी २०२६
चिखली तालुक्यातील हातणी गावात घरगुती वादातून पुतण्याचा निर्घृण खून करून फरार झालेल्या काकाला चिखली पोलीस स्टेशनच्या D.B. पथकाने अवघ्या काही तासांत अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी रामचंद्र मारोती जाधव (रा. हातणी) यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली. दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरात जेवण सुरू असताना त्यांचा मुलगा विनोद जाधव आणि सून सौ. मिरा यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला.वाद सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी नातू गोपाल अजाबराव जाधव हा घरात आला.नेहमीच्या भांडणामुळे समाजात बदनामी होत असल्याचे सांगत त्याने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र या वादाचा राग मनात धरून विनोद उर्फ रामचंद्र जाधव याने गोपालवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला, ज्यात गोपालचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. 60/26 नुसार कलम 103(1), 352 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउपनि भागवतकर यांच्याकडे देण्यात आला.घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या सूचनेनुसार D.B. पथकाने हातणी शिवारातील संपूर्ण परिसर पिंजून काढत आजूबाजूच्या शेतांची तपासणी केली.
दरम्यान आरोपी मंकया शेतामध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच D.B. पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
हे पण वाचा..
सिंदखेडराजा पंचायत समितीतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर; कर्मचारी कार्यालयाऐवजी बाहेरच अधिक दिसतात!
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून चिखली पोलीस स्टेशन व D.B. पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ताज्या गुन्हेगारी बातम्यांसाठी Kattanews.in ला रोज भेट द्या व बातमी शेअर करा.