हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा? CCTV मुळे उघड झाला धक्कादायक प्रकार; चिखलीत आरोपीवर गुन्हा

On: May 26, 2026 8:50 AM
Follow Us:
चिखली येथे घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा केल्याचा आरोप; CCTV फुटेजनंतर गुन्हा दाखल

चिखली |विशाल गवई 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे. मकरध्वज खंडाळा येथे एका घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात आला असून, CCTV फुटेजच्या आधारे आरोपीविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ अंतर्गत झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण संजय साळवे (वय २९, रा. मकरध्वज खंडाळा, ता. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्रवीण साळवे हे बंगळुरू येथे खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असून त्यांची पत्नी गावात वास्तव्यास आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.२० वाजता फिरण्यासाठी बाहेर गेलेल्या प्रवीण साळवे यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. घराच्या व्हरांड्यात एक पूर्ण लिंबू आणि एक अर्धवट कापलेले लिंबू पडले असल्याचे पत्नीने सांगितले. त्यानंतर साळवे तातडीने घरी परतले असता घरासमोर ते लिंबू पडलेले दिसून आले.

या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित प्रकार हा जादूटोणा अथवा अघोरी प्रथा करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.

दरम्यान, घरासमोरील CCTV फुटेज तपासण्यात आले असता सकाळी अंदाजे ५.१३ वाजता शेख गणी उर्फ शेख दादू हा घरासमोर लिंबू टाकताना दिसल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. यानंतर त्यांनी थेट चिखली पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

चिखली पोलीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मगर करीत आहेत.

या घटनेनंतर मकरध्वज खंडाळा परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

संकेत जाधव यांच्या पुढाकाराने तात्काळ कारवाई

या प्रकरणात फिर्यादी प्रवीण साळवे यांनी ऑल इंडिया पँथर सेनेचे विदर्भाध्यक्ष संकेत जाधव यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेत संकेत जाधव यांनी तत्काळ चिखली पोलीस स्टेशन गाठून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संकेत जाधव यांनी फिर्यादीला न्याय मिळवून दिल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.


Related News


हे आवश्यक करा..

दररोजच्या ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी मिळणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या. तसेच आमचे WhatsApp Channel आणि Facebook Page फॉलो करा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्ड्यात विद्यार्थिनींशी संवाद साधताना दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक द्रोपदी साळवे

साखरखेर्ड्यात दामिनी पथक ॲक्शन मोडमध्ये; टवाळखोरांना थेट इशारा, विद्यार्थिनींना दिला मोठा दिलासा

सायाळा गावातील शेतकऱ्याच्या विहिरीतून सोलर मोटार पंप चोरी झाल्यानंतर साखरखेर्डा पोलिसांत NCR दाखल

सायाळा येथे शेतकऱ्याच्या विहिरीतून सोलर मोटार पंप चोरी; साखरखेर्डा पोलिसांत NCR, परिसरात चोरांची दहशत

चिखली नगर परिषदेच्या मालमत्ता करात 10 पट वाढ झाल्याचा आरोप; मनसेने पुरावे सादर करत आंदोलनाचा इशारा

चिखली नगर परिषदेचा अजब कारभार; मालमत्ता करात चक्क 10 पट वाढ? मनसेने सादर केले पुरावे, आंदोलनाचा इशारा

आडगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालक नसल्याने आरोग्य सहायक रंगनाथ काकड यांनी स्वतःच्या वाहनातून गंभीर रुग्णाला सिंदखेड राजा रुग्णालयात पोहोचवतानाचे प्रतीकात्मक छायाचित्र

आडगाव राजा PHC मध्ये चालकाअभावी रुग्णवाहिका ठप्प; आरोग्य सहायक रंगनाथ काकड यांनी स्वतःच्या वाहनातून गंभीर रुग्णाला पोहोचवले

चिखलीतील शेलगाव जहागीर मारहाण प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते

चिखलीत संतापाचा उद्रेक! 24 तासांत आरोपींना अटक नाही तर भव्य निषेध मोर्चा

साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर

साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालय 15 ऑगस्टपूर्वी सुरू होणार? प्रशासनाचे तातडीचे आदेश

Leave a Comment