हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

इंधन साठेबाजी आढळली तर थेट परवाना रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा पेट्रोल पंप चालकांना इशारा

On: May 24, 2026 3:07 PM
Follow Us:
जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे पेट्रोल पंपावरील इंधन साठ्याची तपासणी करताना

बुलढाणा | विशाल गवई 

जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या चर्चांनी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असतानाच प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. इंधन साठेबाजी, कृत्रिम टंचाई आणि पेट्रोल पंपांवरील वाढती गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी शनिवारी जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांना अचानक भेटी देत प्रत्यक्ष इंधन साठ्याची तपासणी केली. या तपासणीदरम्यान साठेबाजी आढळल्यास संबंधित पेट्रोल पंपाचा परवाना थेट रद्द करण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील तसेच प्रमुख महामार्गांवरील पेट्रोल पंपांची पाहणी करत व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी पंपांवरील ‘स्टॉक रजिस्टर’ची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच भूगर्भातील टाक्यांमध्ये प्रत्यक्ष किती इंधन उपलब्ध आहे, याची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना अचूक नोंदी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

तपासणीदरम्यान ऑइल कंपन्यांचे प्रतिनिधी, जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्यासोबतही जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. जिल्ह्यात सध्या पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहनही करण्यात आले.

काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संवेदनशील ठिकाणी चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

दरम्यान, प्रशासनाच्या या अचानक कारवाईमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांमध्ये खळबळ उडाली असून, इंधन साठेबाजी करणाऱ्यांविरोधात पुढील काही दिवसांत आणखी कडक पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाचे : प्रशासनाने जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि घाबरून अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


हे पण वाचा…
👉 रेती माफियांचा पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला; साखरखेर्ड्यात निषेध, आरोपींना अटक करण्याची मागणी
👉 कॅनमध्ये पेट्रोल न दिल्याने तलवार-कोयत्यासह पेट्रोल पंपावर दहशत; कर्मचाऱ्यांना मारहाण
👉 २७० क्विंटल हरभरा घेऊन ट्रक गायब! बुलढाण्यात LCB ची मोठी कारवाई; ५ आरोपी जेरबंद, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त


 हे नक्की करा..
अशाच ब्रेकिंग आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

नांदुरा येथील पूर्णा नदीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुर्यात शोककळा

साखरखेर्डा गट क्रमांक 870 जमीन प्रकरणात क्रीडांगणाची पाहणी करताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा गट नं. 870 जमीन प्रकरण गाजले; बनावट फेरफार, भूमाफियांचा डाव? महसूल कलम 155 अंतर्गत कारवाईची मागणी

देऊळगाव राजा येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान व अन्नदान करताना

देऊळगाव राजात सेवाभावाचा आदर्श! पायी दिंडीतील 51 महिला वारकऱ्यांना वस्त्रदान, अन्नदानाने जिंकली मने

साखरखेर्डा येथील बंद असलेला पशुवैद्यकीय दवाखाना

साखरखेर्ड्यात ना डॉक्टर, ना कर्मचारी; पशुवैद्यकीय दवाखाना कायम बंद, २५ गावांतील पशुपालक अडचणीत

साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास क्रीडांगणाच्या जमिनीवर जमलेले युवक

साखरखेर्ड्यात सरकारी ई-क्लास जमिनीवर डल्ला? क्रीडांगण नांगरून ताबा घेण्याचा प्रयत्न; युवक संतप्त

शिंदी गावात 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू

शिंदीत 24 तासांत तिघांचा मृत्यू; दोघांचा हृदयविकाराने तर एकाचा ब्रेन हॅमरेजने, गावावर शोककळा

Leave a Comment