हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाणा पॅटर्नचा राज्यभर डंका! ‘सहज’ आणि ‘महसूल मित्र’ आता महाराष्ट्रात लागू होणार?

On: March 19, 2026 8:57 AM
Follow Us:
Buldhana Sahaj System Mahasul Mitra AI Maharashtra Government Services Online
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलढाणा |२८ मार्च २०२६ 

बुलढाणा जिल्ह्यातील ‘सहज प्रणाली’ आणि ‘महसूल मित्र’ या AI आधारित उपक्रमांचा राज्यभर डंका वाजत आहे. शासनाच्या कामात पारदर्शकता आणि वेग आणणाऱ्या या डिजिटल उपक्रमांची राज्य सेवा हक्क आयोगाने विशेष दखल घेतली असून, हा ‘बुलढाणा पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस करण्यात आली आहे.

मुंबई येथे पार पडलेल्या आयोगाच्या ३१ व्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या प्रणालींचे सादरीकरण केले. यावेळी मुख्य सेवा हक्क आयुक्तांनी या उपक्रमांचे कौतुक करत, यामुळे ईझी ऑफ डुईंग बिझिनेस आणि सेवा हक्क कायद्याची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य होत असल्याचे स्पष्ट केले.

‘महसूल मित्र’ हा AI आधारित व्हॉट्सअॅप द्विभाषिक चॅटबॉट असून, नागरिकांना महसूल सेवांची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया एका क्लिकवर मिळते. यामध्ये व्हॉइस टू टेक्स्ट सुविधा तसेच जमीन विषयक कायदे आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सहज उपलब्ध आहेत.

‘सहज प्रणाली’द्वारे १८५० पासूनचे खरेदी-विक्री दस्तऐवज संगणकीकृत करण्यात आले असून, नागरिक आता घरबसल्या UPI द्वारे शुल्क भरून QR कोड असलेले प्रमाणित दस्तऐवज डाउनलोड करू शकतात. यामुळे कार्यालयांचे हेलपाटे टळणार असून वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.

या प्रणालीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जीपीएस आधारित तक्रार नोंदणी. अवैध वाळू उपसा किंवा महसूल विषयक तक्रारी थेट लोकेशनसह नोंदवता येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, आपले सरकार सेवा केंद्र आणि आधार केंद्रांची माहितीही या चॅटबॉटवर उपलब्ध आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या तंत्रस्नेही उपक्रमामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होणार असून, लवकरच हा पॅटर्न राज्यभर लागू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

👉 अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या Kattanews.in ला भेट देत रहा.

Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment