हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
शेतकऱ्यांनो सावधान! महाराष्ट्रात येलो अलर्ट ‘समृद्धी’वरील सोन्याची लूट! पोलिसांकडून आरोपेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयतGold Price Today : एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ₹4000 बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडLadki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या महिला

बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; आचारसंहिता लागू, प्रचाराला अवघे चार दिवस-कोण राखेल आपला गड ?

On: November 5, 2025 7:20 AM
Follow Us:

बुलढाणा/प्रतिनिधी 

Buldhana Nagar Palika Election 2025 चा बिगुल अखेर वाजला आहे. बुलढाणा नगरपालिका निवडणूक या वेळेस अत्यंत महत्वाची ठरणार असून,

Maharashtra Nagar Palika Election 2025 अंतर्गत जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून प्रचारासाठी केवळ चार दिवसांचा अवधी मिळाला आहे. त्यामुळे “कोण राखेल आपला गड” हा प्रश्न सध्या प्रत्येक राजकीय घराण्यात गाजतोय.

बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, शेगाव, खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि मलकापूर या नगरपालिकांमध्ये या वेळेस चुरस रंगणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत, तर मेहकरमध्ये उद्धव सेनेचा आमदार आहे.

प्रचाराला अवघे चार दिवस, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेचच प्रत्येक पक्षाने प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. Buldhana Nagar Palika Election 2025 साठी सर्वच प्रमुख पक्ष — भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्थानिक गट तयारीला लागले आहेत. प्रचाराला केवळ चार दिवसांचा कालावधी असल्याने प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांची धावपळ दिसतेय.

२०१७ मध्ये असे होते बलाबल

२०१७च्या निवडणुकीत काँग्रेसचे ८३, भाजपचे ७२, शिवसेनेचे ४९, राष्ट्रवादीचे १९ आणि अपक्ष ३१ सदस्य निवडून आले होते. या वेळेस बदलेले राजकीय चित्र पाहता कोणता पक्ष पुढे राहील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एकूण ४.७७ लाख मतदार ठरवणार जिल्ह्याचे राजकारण

या बुलढाणा नगरपालिका निवडणूक प्रक्रियेत एकूण ४ लाख ७७ हजार २५७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक मतदार खामगाव (७३,५३८) आणि बुलढाणा (६८,९९७) येथे असून, सर्वात कमी मतदार सिंदखेड राजा (१४,३९४) मध्ये आहेत.

हे पण‌ वाचा.

राज्यात आचारसंहिता लागू, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अखेर घोषणा.

निवडणूक खर्च मर्यादा

‘अ’ वर्ग नगरपरिषदेसाठी थेट नगराध्यक्षांना १५ लाख आणि सदस्यांना ५ लाख रुपये खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे. ‘ब’ वर्ग नगरपरिषदेसाठी ११.२५ लाख, तर ‘क’ वर्गासाठी ७.५० लाख रुपये इतकी मर्यादा आहे.

या वेळचा Maharashtra Nagar Palika Election 2025 हा बुलढाणा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांना दिशा देणारा ठरेल. Buldhana Nagar Palika Election 2025 मध्ये कोणता पक्ष आपला गड राखतो आणि कोणाचा गड कोसळतो, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

👉देशातील व राज्यातील ताज्या घडामोडी व अपडेट मिळवण्यासाठी आजच आपल्या kattanews.in न्यूज पोर्टलला भेट द्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!