हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
आजचे राशिभविष्य (Today Rashi Bhavishya in Marathi) | 1 नोव्हेंबर 2025 | संजय गायकवाडांविरुद्ध कामासाठी ‘एक कोटी’ दिLadki Bahin Yojana eKYC 2025 : लाडकी बहीण योजना eKYC सुरू, शेवटची तादेऊळगाव राजा : डीपी रोडवरील अतिक्रमणावरून वाबुलढाणा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्य५० खोके’ नंतर आता ‘२१ डिफेंडर’? ठेकेदाराकडून

Buldhana: किनगाव राजा प्रकरणात नवा ट्विस्ट! युवकाने घेतले विष; ठाणेदार संजय मातोंडकर यांचे मोठे स्पष्टीकरण समोर.

On: October 31, 2025 7:28 AM
Follow Us:

बुलढाणा प्रतिनिधी | Kattanews.in

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवली आहे. बैलजोडी चोरीची तक्रार न घेतल्याच्या आरोपानंतर एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

पण पोलिस चौकशीत या प्रकरणात धक्कादायक नवा ट्विस्ट समोर आला आहे — संबंधित बैलजोडी चोरीची नसून आर्थिक व्यवहारातून तात्पुरती देण्यात आली होती!

युवकाने व्हिडिओ पोस्ट करून घेतले विष

लिंगा गावातील पवन प्रल्हाद जायभाये या तरुणाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून किनगाव राजा पोलिसांवर आरोप केले.“पोलिस तक्रार घेत नाहीत आणि मारहाण करतात,” असा आरोप करत त्याने विष प्राशन केले.हा व्हिडिओ काही तासांतच buldhana जिल्ह्यात व्हायरल झाला. नातेवाइकांनी त्याला तत्काळ बीबी येथील रुग्णालयात दाखल केले आणि नंतर जालना येथे हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

पोलिस चौकशीत उघड झाले वेगळे सत्य.

पोलिस तपासात मात्र समोर आलं की — पवनच्या वडिलांनी काही देणेदारांकडे पैसे थकवले होते.त्यामुळे बैलजोडी तात्पुरती ठेवण्यात आली होती, पण गैरसमजातून युवकाने टोकाचं पाऊल उचललं.या घटनेनंतर तब्बल २४ जणांनी पवन आणि त्याचे वडील प्रल्हाद जायभाये यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली असून तपास सुरू आहे.

हे पण वाचा.

Reel बनविताना भीषण अपघात! युवकाचा रेल्वेखाली कटून मृत्यू; शेगाव परिसरात हळहळ.

ठाणेदार संजय मातोंडकर यांचे मोठे स्पष्टीकरण

किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर म्हणाले —

“तरुणाने पोलिसांवर दबाव आणण्यासाठी विष घेतले. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा अत्याचार केलेला नाही. सखोल तपास सुरू आहे आणि सत्य समोर आणलं जाईल.”

या घटनेनंतर परिसरात शांतता असली तरी लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!