बुलढाणा/प्रवीण गरुडे
भीषण अपघात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघातांच्या मालिकेत सोमवारी पुन्हा एक धक्कादायक घटना घडली.
करडी पुलावर भीषण अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून करडी पुलावर भीषण अपघात हा अपघात इतका भीषण होता की ट्रिपल सीट दुचाकीस्वार तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील करडी (धाड)dhad येथील पुलावर छत्रपती संभाजीनगरकडून मलकापूरकडे (Malkapur) जाणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आणि समोरून येणारी दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर दुचाकी थेट बसखाली घुसली आणि काही क्षणांतच तिघांचे प्राण गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर आगाराची एसटी बस (क्रमांक एमएच-06-बीडब्ल्यू-3638) संभाजीनगरहून मलकापूरकडे जात होती. त्याच वेळी ढाल सावंगी (ता. बुलढाणा,buldhana) येथील अंकुश पाडळे, रवी चंदनशे आणि कैलास शिंदे हे तिघे एकाच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करत धाडवरून करडीच्या दिशेने जात होते.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुरा झाला. एका युवकाच्या डोक्याची कवटी फुटून मेंदू रस्त्यावर सांडल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहून उपस्थित नागरिक हादरून गेले. पुलावर रक्त सांडले होते आणि अवयव विखुरलेले दिसत होते.
हे पण वाचा..
देवदर्शनासाठी निघाले, पण परतले नाहीत! अपघातात आतेभाऊ व मामेबहीण ठार.
या भीषण अपघातानंतर करडी पुलावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे ढाल सावंगी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
👉 अशाच ताज्या, थेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी KattaNews.in ला Follow करा.











