हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बकरी गिळणारा महाकाय अजगर मृतावस्थेत; हनवतखेडच्या शिवारात खळबळ, दुसरा अजगर असल्याने शेतकऱ्यांत भीती

On: August 21, 2026 1:14 PM
Follow Us:
हनवतखेडमध्ये बकरी गिळणारा महाकाय अजगर मृतावस्थेत
सिंदखेडराजा |समाधान सरकटे 

 

नागपंचमीच्या सणाचा उत्सव सुरू असतानाच हनवतखेड परिसरातील मांगीर बाबा मंदिराजवळील तलावाच्या काठच्या शिवारात थरारक घटना समोर आली आहे. शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या बकरीवर महाकाय अजगराने झडप घालून तिला अख्खी गिळल्याने परिसरात खळबळ उडाली.

या घटनेमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी बकरी गिळणारा तोच अजगर शिवारात मृतावस्थेत आढळून आला. अजगर मृतावस्थेत असल्याची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.

मृत अजगराचे पोट फुगलेले दिसत असल्याने त्याने बकरी गिळल्याचे स्पष्ट झाले. स्थानिकांच्या मदतीने अजगराच्या पोटातून गिळलेली बकरी बाहेर काढण्यात आली. हा प्रकार पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, मांगीर बाबा मंदिर परिसरातील तलावाकाठच्या शिवारात आणखी एक महाकाय अजगर फिरत असल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजूर आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजगर पुन्हा आढळल्यास काय करायचे, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन राबवून दुसऱ्या अजगराचा शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड यांनी वनविभागाच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वनविभागाकडून घटनेचा रीतसर पंचनामा करण्यात आला आहे.

मृत अजगराचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड यांनी दिली. शवविच्छेदनानंतर अजगराच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, परिसरात दुसरा अजगर असल्याचा दावा होत असल्याने वनविभागाने तातडीने त्याचा शोध घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

📲 ताज्या स्थानिक बातम्यांसाठी kattanews.in चा WhatsApp ग्रुप जॉईन करा

सिंदखेडराजा, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपशी जोडले जा.

Related News

टीप : अजगराच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार असून, दुसरा अजगर असल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांग्रा शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी

मलकापूर पांग्रा शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी; मोहिनी मगर तालुक्यात द्वितीय

मेरा बुद्रुकचे शुभम डोंगरदिवे UPSC यशानंतर सनदी अधिकारी

मेरा बुद्रुकच्या सुपुत्राची UPSC मध्ये झेप; शुभम डोंगरदिवे यांची सनदी अधिकारी म्हणून गुजरातमध्ये नियुक्ती

चिखली दरेगाव मार्गावर मुक्कामी एसटी बस सुरू करण्याची मागणी

सायंकाळी बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; चिखली–दरेगाव मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी

Buldhana News - चिखलीत अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चाचा इशारा

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात चिखलीत महामोर्चाचा इशारा; ८ सप्टेंबरला तहसील कार्यालयावर आंदोलन

लोणारमध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात निवेदन देताना नागरिक

स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा जोडोमारो आंदोलन; लोणारमध्ये रि.सेनेचा इशारा

sakharkherda-theft-buldhana-crime-news

साखरखेर्डा परिसरात चोरट्यांचा हैदोस! दिवसाढवळ्या घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास; सवडद, पिंपळगाव सोनारा, हिवरा आश्रमात धुमाकूळ

Leave a Comment