हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाण्यातील बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा विधान परिषदेत गाजला; समाजकल्याण अधिकारी अनिता राठोडसह दोन अधिकारी निलंबित.

On: December 14, 2025 8:51 AM
Follow Us:
बुलढाणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

विशाल गवई/प्रतिनिधी 

बुलढाणा : बुलढाण्यातील बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण आज विधान परिषदेत मोठ्या प्रमाणात गाजले. बुलढाणा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळ्यामुळे विमुक्त जाती ‘अ’ संवर्गातील बंजारा समाजाच्या हक्कांवर गंभीर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला. बुलढाणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात खोटी प्रमाणपत्रे मिळवून शिक्षण व नोकरीच्या संधी बळकावल्याचा मुद्दा उपस्थित होताच बुलढाणा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळ्यावर सरकारला तात्काळ भूमिका घ्यावी लागली.काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित करत सुमारे ५० जणांनी बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय शिक्षण व शासकीय नोकऱ्यांचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणामुळे बंजारा समाजावर मोठा अन्याय झाल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सभागृहात माहिती देताना उपायुक्त तथा जात पडताळणी समितीच्या सदस्य सचिव वृषाली शिंदे आणि संशोधन अधिकारी अनिता राठोड यांना निलंबित करण्यात आल्याचे जाहीर केले. संबंधित अधिकाऱ्यांवर बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात गंभीर अनियमिततेचे आरोप सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जात पडताळणी समितीचे तत्कालीन अध्यक्ष तथा त्या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले आर. एल. गगरानी हे २०१९ मध्येच निवृत्त झाल्याने त्यांच्यावर विभागीय चौकशी करता येणार नसल्याचे मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले. मात्र, सभापती राम शिंदे यांनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

हे पण वाचा..

खामगाव–जालना रेल्वेमार्गाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांची समितीला ग्वाही — तातडीचा पाठपुरावा.

विधान परिषदेत झालेल्या या चर्चेमुळे बुलढाण्यातील बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून, पुढील काळात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


🔗 हे पण वाचा..

👉 हे आवश्य करा..

अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी KattaNews.in ला दररोज भेट द्या, आमचा WhatsApp अलर्ट जॉइन करा आणि ही बातमी शेअर करा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment