हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाण्यात ACB ची मोठी कारवाई! वनविभागाची ACF अश्विनी आपेट लाच घेताना रंगेहात

On: January 1, 2026 8:29 AM
Follow Us:
बुलढाणा ACB कारवाईत ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडली
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

विशाल गवई/कट्टा न्यूज नेटवर्क 

बुलढाणा : वनविभागाची ACF अश्विनी आपेट लाच घेताना रंगेहात पकडल्या मुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाणा वनविभागाच्या सहायक वन संरक्षक अधिकारी अश्विनी आपेट हिला 15 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई ACB ने सापळा रचून केली असून Ashwini Apet Bribe Case मुळे वनविभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अवैध मार्गाने तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी अश्विनी आपेट हिने तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी अॅडव्हान्स म्हणून 15 हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. यावेळी तिच्यासोबत लिपिक अमोल मोरे यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

अश्विनी आपेट ही 2016 बॅचची रेंज फॉरेस्ट ऑफिसर असून, मागील वर्षीच तिला सहायक वन संरक्षक अधिकारी पदावर बढती मिळाली होती. मात्र बढतीनंतरही तिच्याविरोधात पैशासंबंधी अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे, या तक्रारी असूनही दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने वनविभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखेर ACB ने पुढाकार घेत सापळा रचून ही मोठी कारवाई केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, अश्विनी आपेट ही बुलढाणा वनविभागात लाचखोर अधिकारी म्हणून ओळखली जात होती. हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर पैसे गोळा करण्यासाठी दबाव टाकल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.

सध्या ACF अश्विनी आपेट आणि लिपिक अमोल मोरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाची नावे पुढे येतात का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

👉 विश्वासार्ह, वेगवान आणि सत्य बातम्यांसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज वेबसाईट
KattaNews.in ला Follow करा.

हे पण वाचा…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment