हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भरधाव रेती टिप्परची दुचाकीला भीषण धडक; उदनापूरच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, अंजनीखुर्द हादरले

On: May 28, 2026 4:57 PM
Follow Us:
अंजनीखुर्द येथे भरधाव रेती टिप्परच्या भीषण धडकेत शेतकरी ठार

लोणार |विनायक कुटे 

लोणार तालुक्यातील रेतीवाहतुकीचा वाढता धोका या मुद्द्यांमुळे पुन्हा एकदा परिसर हादरला आहे. अंजनीखुर्दजवळ भरधाव वेगाने रेतीवाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने उदनापूर येथील शेतकरी गजानन हरिभाऊ मुळे (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपी चालकावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, उदनापूर ता. लोणार येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन हरिभाऊ मुळे हे दुचाकी क्रमांक एमएच २८ सीए ६८३० ने सुलतानपूरवरून आपल्या गावी परत जात होते. दरम्यान, अंजनीखुर्द येथील माऊली मेडिकल कॉलेज परिसरात विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीवाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या अपघातातील टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी ८३०२ असल्याची माहिती समोर आली असून चालक योगेश रामराव देशमुख (वय २९, रा. आध्रुड ता. मेहकर) याच्यावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात येत आहे. धडक इतकी भीषण होती की गजानन मुळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.

घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरल्यानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी वाहन चालकावर तात्काळ गुन्हा दाखल केल्याशिवाय घटनास्थळ सोडणार नाही, अशी भूमिका काही नागरिकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे, मेहकरचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला आहे.

यावेळी पोहेकॉ. लक्ष्मण कटक आणि शिवानंद केदार यांनीही मदतकार्य केले. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत लोणारचे तहसीलदार भूषण पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनी पंचनामा करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

दरम्यान, लोणार तालुक्यात भरधाव रेतीवाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने रेतीवाहतुकीवर कठोर नियंत्रण आणावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.


हे पण वाचा..


हे आवश्यक करा..

स्थानिक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व अपडेट्ससाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a Comment