हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्ड्यात पोलवर वीज दुरुस्ती करताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू; २५ वर्षांत पाचवी दुर्घटना

On: May 27, 2026 8:16 AM
Follow Us:
साखरखेर्ड्यात पोलवर वीज दुरुस्ती करताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू

साखरखेर्डा |समाधान सरकटे 

साखरखेर्ड्यात पोलवर वीज दुरुस्ती करताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. साखरखेर्ड्यातील वीज दुरुस्ती कामादरम्यान झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. साखरखेर्ड्यात वीज दुरुस्ती करत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मृतकाचे नाव बद्रीनाथ लक्ष्मण लंबे (वय ३५) असे असून ते वीज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. ही घटना पिंपळगाव सोनारा शिवारात घडली. वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ते पोलवर चढून काम करत होते.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी वादळामुळे साखरखेर्डा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध भागांमध्ये दुरुस्तीचे काम केले. मात्र पिंपळगाव सोनारा भागातील काही कामे शिल्लक होती.

मंगळवारी सकाळी बद्रीनाथ लंबे हे मारोती आश्रू वायाळ यांच्या शेताजवळील ट्रान्सफॉर्मर परिसरातील वीज पोलवर चढून काम करत होते. त्यावेळी अचानक वीज वाहक तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना जबरदस्त धक्का बसला. गंभीर जखमी झाल्यानंतर ते खाली कोसळले.

घटनास्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी तातडीने त्यांना साखरखेर्डा येथील डॉ. विशाल मगर यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी चिखली येथे हलविण्याचा सल्ला दिला. चिखली येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिंदी येथे मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, काम सुरू करण्यापूर्वी साखरखेर्डा ३३ केव्ही उपकेंद्रातून रितसर परवानगी घेण्यात आली होती का, तसेच वीजपुरवठा सुरू कसा राहिला, याबाबत ग्रामस्थांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

घटनेची माहिती मिळताच सिंदखेडराजा येथील वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्रीनिवास बडगू यांनी घटनास्थळी भेट दिली. उपकेंद्रातील हजेरी बुक गायब असल्याचेही समोर आल्याची चर्चा आहे. यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

याबाबत कनिष्ठ अभियंता रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वृत्त लिहिपर्यंत साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

“कंत्राटी कामगार अपघाताची दोन दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.”
— श्रीनिवास बडगू, उपअभियंता, सिंदखेडराजा


Related News


हे आवश्यक करा..

स्थानिक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि Google Discover वर ट्रेंडिंग अपडेट्ससाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखली येथे घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा केल्याचा आरोप; CCTV फुटेजनंतर गुन्हा दाखल

घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा? CCTV मुळे उघड झाला धक्कादायक प्रकार; चिखलीत आरोपीवर गुन्हा

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे पेट्रोल पंपावरील इंधन साठ्याची तपासणी करताना

इंधन साठेबाजी आढळली तर थेट परवाना रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा पेट्रोल पंप चालकांना इशारा

रेती माफियांच्या हल्ल्यानंतर पत्रकार रामदास कहाळे प्रकरणावर साखरखेर्ड्यात निषेध

रेती माफियांचा पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला; साखरखेर्ड्यात निषेध, आरोपींना अटक करण्याची मागणी

खामगावातील पेट्रोल पंपावर तलवार आणि कोयत्यासह आरोपींकडून दहशत

कॅनमध्ये पेट्रोल न दिल्याने तलवार-कोयत्यासह पेट्रोल पंपावर दहशत; कर्मचाऱ्यांना मारहाण

बुलढाण्यात हरभरा भरलेला ट्रक गायब प्रकरणात LCB ने ५ आरोपींना अटक केली

२७० क्विंटल हरभरा घेऊन ट्रक गायब! बुलढाण्यात LCB ची मोठी कारवाई; ५ आरोपी जेरबंद, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंदखेडराजा येथे LIVE वार्तांकन करताना पत्रकारावर हल्ला झाल्याचा आरोप

वाळू माफियांविरोधात LIVE वार्तांकन करताना पत्रकाराला मारहाण? दोषींना अटक करा, नाहीतर आंदोलन — पत्रकार संघटनांचा अल्टिमेटम

Leave a Comment