नागपूर /प्रतिनिधी
Bacchu Kadu : नागपूरात सुरू असलेल्या Farmers Protest Nagpur मध्ये बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. “कर्जमाफी न झाल्यास आम्ही रेल्वे सेवा ठप्प करू!” असा इशारा देत त्यांनी राज्य सरकारवर दबाव आणला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले असून, आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
Bacchu Kadu Farmers Protest Nagpur मध्ये शेतकरी, मजूर, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.या आंदोलनात प्रमुख मागण्या म्हणजे संपूर्ण कर्जमाफी, रोजगार हमी योजनेत शेतीकामांचा समावेश, तसेच दिव्यांग आणि मच्छीमार बांधवांसाठी विशेष योजना या आहेत.
माजी मंत्री आणि Prahar Janshakti Party चे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले की,“सरकारने कर्जमाफीबाबत चर्चा केली असली तरी अजूनही ठोस तारीख दिलेली नाही. गुरुवारी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, आणि जर निर्णय आमच्या बाजूने झाला नाही, तर आम्ही रेल्वे गाड्या थांबवू.”
हे पण वाचा.
शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! १५ दिवसांत ११ हजार कोटी रुपये थेट खात्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
या आंदोलनामुळे नागपूर-वर्धा, जबलपूर-हैदराबाद आणि इतर महामार्गांवर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.कडू पुढे म्हणाले — “आम्ही कर्जमाफी मिळेपर्यंत लढा थांबवणार नाही. Farm Loan Waiver Maharashtra ही आमची प्राथमिक मागणी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता तरी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला पाहिजे.”

शेतकऱ्यांचे हे आंदोलन “Rail Roko Protest 2025” मध्ये परिवर्तित होण्याची शक्यता असून, सरकारने लवकरच निर्णय न घेतल्यास रेल्वे सेवा ठप्प होण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.











