हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अण्णाभाऊ साठे महामंडळ थेट कर्ज योजना : मातंग समाजासाठी 1 लाखांपर्यंत कर्ज, 29 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

On: December 27, 2025 10:58 PM
Follow Us:
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज योजना मातंग समाज बुलढाणा
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

बुलढाणा |विशाल गवई प्रतिनिधी

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज योजना अंतर्गत मातंग समाजातील पात्र लाभार्थ्यांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार असून, अण्णाभाऊ साठे महामंडळ थेट कर्ज योजना ही राज्यातील मागासवर्गीय घटकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ थेट कर्ज योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया दि. 29 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील इच्छुक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या या थेट कर्ज योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात 50 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये असून, यामध्ये 10 हजार रुपये अनुदान, 5 हजार रुपये म्हणजेच 5 टक्के लाभार्थी सहभाग आणि उर्वरित 85 हजार रुपये महामंडळाकडून थेट कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी एकूण आर्थिक उद्दिष्ट 50 लाख रुपये ठेवण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मातंग समाजातील 12 पोटजातींतील पात्र अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, तसेच अर्जदाराचा किमान सिबिल क्रेडिट स्कोअर 500 असणे बंधनकारक आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे थेट असून अर्जदाराने स्वतः आवश्यक कागदपत्रांसह दोन प्रतींमध्ये जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे. कोणत्याही त्रयस्थ किंवा मध्यस्थामार्फत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दोन फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, घरटॅक्स पावती, कोटेशन, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र अथवा शॉप अॅक्ट परवाना, व्यवसायाशी संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र, शैक्षणिक दाखला, यापूर्वी अनुदान किंवा कर्ज न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र तसेच आधार संलग्न बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.

प्राप्त अर्जांची निवड लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेनंतर मा. उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठीद्वारे म्हणजेच लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. निवड झाल्यानंतर एक जामीनदारासह सर्व वैधानिक कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर कर्ज वितरण करण्यात येईल.

हे पण वाचा..

सिंदखेडराजात धक्कादायक प्रकार: ११ वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलांचा अतिप्रसंगाचा प्रयत्न; तालुक्यात संताप

महामंडळाच्या विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक डी. एस. पाखमोडे यांनी केले आहे.


📢 आवश्यक करा..
👉 अशाच शासन योजना, कर्ज योजना, अनुदान योजना व ताज्या ब्रेकिंग न्यूजसाठी Kattanews महाराष्ट्रातील नंबर एक ची न्यूज वेबसाईट kattanews.in ला दररोज भेट द्या व फॉलो करा.


📰 हे पण वाचा:

✔️ बुलढाणा जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना: पोटच्या चिमुरड्यांना मृत्यूच्या दारात ढकलून मातेने संपवली जीवनयात्रा.
✔️ घाटपुरी येथील श्री जगदंबा देवी मंदिरात धाडसी चोरी; देवीचे चांदीचे मुकूट, डोळे व मंगळसूत्र लंपास.
✔️ अवैध रेती वाहतुकीचा कहर! आडविहीर पुलावर रेती सांडली; २ कार थेट नाल्यात कोसळल्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Toyota company earn and learn scheme job opportunity for 12th pass students with stipend up to 17800 rupees

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! Toyota कंपनीत ‘कमवा व शिका’ योजना; दरमहा 17,800 रुपये विद्यावेतन

महाराष्ट्र एसटी महामंडळ 17742 चालक वाहक पदांची भरती

एसटीमध्ये मेगा भरती! १७,७४२ चालक-वाहक पदांसाठी मोठी संधी; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

मलकापूर येथे संजय गांधी निराधार योजनेच्या प्रलंबित प्रकरणांबाबत कलीम शेख यांनी SDO संतोष शिंदे यांना निवेदन दिले

दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठांसाठी दिलासा! संजय गांधी योजनेची प्रकरणे 21 मार्चपर्यंत निकाली काढण्याचे आदेश

सिंदखेडराजा तहसील कार्यालयात 17 मार्चला जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा लिलाव

जमीन महसूल थकबाकीवर मोठी कारवाई; सिंदखेडराजा तहसील कार्यालयात 17 मार्चला मालमत्तेचा जाहीर लिलाव

LPG gas cylinder booking new rules after ESMA implementation in India

देशभरात ESMA लागू! आता गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले; 21 नाही तर ‘इतक्या’ दिवसांनीच मिळणार सिलिंडर

MLA Shwetatai Mahale demand 50 percent चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले विधानसभेत नोकरभरती परीक्षांचे शुल्क कमी करण्याची मागणी करताना

मोठी अपडेट! सरकारी नोकरभरती परीक्षांचे शुल्क 50% करण्याची मागणी; लाखो विद्यार्थ्यांना मिळू शकतो दिलासा

Leave a Comment