हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

घाटपुरी येथील श्री जगदंबा देवी मंदिरात धाडसी चोरी; देवीचे चांदीचे मुकूट, डोळे व मंगळसूत्र लंपास

On: December 26, 2025 9:11 AM
Follow Us:
घाटपुरी श्री जगदंबा देवी मंदिरात झालेली चोरी – खामगाव

खामगाव/प्रतिभा जगदाने 

: खामगाव शहरालगत असलेल्या घाटपुरी येथील श्री जगदंबा देवी संस्थान मंदिरात चोरी झाल्याची खळबळजनक घटना २५ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मागील बाजूस असलेली लोखंडी खिडकी कापून आत प्रवेश करत देवी व गणपतीचे चांदीचे मुकूट, चांदीचे डोळे व मंगळसूत्र असा सुमारे ७३ हजार रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केला आहे.

ही घाटपुरी मंदिर चोरी २४ डिसेंबरच्या रात्री घडली असल्याचा प्राथमिक अंदाज असून, पुजारी संजय शर्मा हे २५ डिसेंबर रोजी पहाटे मंदिरात गेले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. गाभाऱ्यातील मौल्यवान दागिने गायब असल्याचे पाहून त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.विशेष बाब म्हणजे, जगदंबा देवी मंदिर चोरी प्रकरणातील चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपीची ओळख पटविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अहेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले.

हे पण वाचा..

बुलढाणा जिल्ह्यात भाजपाचा दबदबा; ४ नगराध्यक्ष, ८९ नगरसेवकांसह नंबर वन, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर.

या खामगाव मंदिर चोरी घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मंदिर परिसरातील सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

👉 तुमच्या परिसरातील बातम्या सर्वात आधी वाचा

Kattanews.in ला Follow करा आणि ताज्या गुन्हेगारी, राजकीय व स्थानिक बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा.

🔗 हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

बुलढाणा वन सर्वेक्षक लाच प्रकरणात एसीबीची कारवाई

लाकूड वाहतुकीच्या परवानगीसाठी २ हजारांची लाच; बुलढाण्यात वन सर्वेक्षकावर गुन्हा दाखल

बेपत्ता महिला शेगाव - पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

शेगाव: ब्युटी पार्लरमध्ये जाते सांगून घराबाहेर पडलेली महिला बेपत्ता, पतीची पोलिसांत तक्रार

जानेफळ पोलिसांची दारू जप्ती कारवाई लावणा बसथांबा

लावणा बसथांब्यावर दारूचा साठा जप्त; जानेफळ पोलिसांची धडक कारवाई

Leave a Comment