हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

अंढेरा येथे पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पत्नी व प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

On: July 24, 2026 1:45 PM
Follow Us:
अंढेरा येथे तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू

चिखली : विशाल गवई 

पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंढेरा (ता. मेरा बु.) येथे २३ जुलै रोजी घडली. आत्महत्येपूर्वी मृतकाने खिशात चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्याचे पोलिसांना घटनास्थळी आढळून आले. या प्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात पत्नी व तिच्या कथित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव सुरज रामभाऊ तेजनकर असे असून, सन २०२१ मध्ये त्याचा विवाह मोहाडी (ता. सिंदखेडराजा) येथील वंदना ज्ञानेश्वर रिंडे हिच्यासोबत झाला होता. या दांपत्याला एक मुलगीही आहे. मुलगी अवघ्या नऊ महिन्यांची असताना वंदना ही आपल्या माहेरी मोहाडी येथे राहण्यास निघून गेली होती.

दरम्यानच्या काळात वंदना हिचे बोरगाव काकडे (ता. चिखली) येथील सतीश रामेश्वर काकडे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या कारणावरून सुरज व वंदना यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.

सुरज हा पत्नीकडे सातत्याने फारकतीची (घटस्फोटाची) मागणी करत होता, मात्र वंदना यास तयार नव्हती. या वादातूनच वंदना हिने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुरजविरुद्ध याआधीच गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरही सुरजला सातत्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अखेर या मानसिक तणावाला कंटाळून सुरज याने अंढेरा येथील नातेवाइकांच्या शेतात टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पंचनाम्यादरम्यान मृतकाच्या खिशात चार चिठ्ठ्या आढळून आल्या, ज्यामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.

मृतकाची आई शशिकला रामभाऊ तेजनकर (वय ६०, रा. अंढेरा) यांच्या फिर्यादीवरून सतीश रामेश्वर काकडे व वंदना सुरज तेजनकर यांच्याविरुद्ध अंढेरा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २४१/२०२६ नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय दिनेश घुगे करत आहेत.

मदतीसाठी हेल्पलाइन: तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कुणी मानसिक तणावातून जात असल्यास एकटे राहू नका. किरण मानसिक आरोग्य हेल्पलाइन: 1800-599-0019 (मोफत, २४x७) येथे संपर्क साधा किंवा जवळच्या समुपदेशकाशी बोला.


📢 अशाच ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी जोडलेले रहा

जिल्ह्यातील क्राईम, राजकारण आणि सामाजिक घडामोडींच्या अपडेट्ससाठी Kattanews.in फॉलो करा. बातमी आवडल्यास शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा.

अधिक बातम्या वाचा

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment