विजय झुंजारे/रिसोड
आपल्या जन्मभूमीचा विकास आणि सामाजिक कल्याणाचा ध्यास घेत, रिसोड (ऋषिवट नगरी) येथील सुपुत्र व देशातील आघाडीचे उद्योगपती श्री. मन्नालालजी अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील अजंता फाउंडेशन मुंबई ही संस्था सातत्याने सामाजिक आणि विकासात्मक कार्यात अग्रभागी असते.
या सामाजिक योगदानाचा एक भाग म्हणून, दि. २८ ऑक्टोबर रोजी रिसोड शहरातील अनित्य चैत्यभूमी (स्मशानभूमी) येथे वाढलेल्या गवतावर तननाशक व किटकनाशकाची फवारणी करण्यात आली. या अभिनव उपक्रमामुळे परिसर स्वच्छ, आरोग्यदायी आणि निर्जंतुक झाला.
हेही वाचा.
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या महिलांची नावे यादीतून वगळली – तुम्ही आहात का?
सामाजिक जबाबदारीचा उत्कृष्ट नमुना
अजंता फाउंडेशन मुंबईकडून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये उद्योगपती तथा सामाजिक विचारवंत श्री. उत्तमचंदजी बगडीया, प्राचार्य डॉ. विजयराव तुरुकमाने, भगवानराव जुमडे, तसेच रिसोड स्वच्छता दूत प्रा. जयंतराव हेलोडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, स्मशानभूमी स्वच्छतेचा एक प्रेरणादायी आदर्श समाजापुढे ठेवण्यात आला आहे.
अजंता फाउंडेशन मुंबई ही संस्था देशभरात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक कल्याण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक श्री. मन्नालालजी अग्रवाल यांचा सामाजिक संवेदनशीलतेचा दृष्टीकोन ही या सर्व कार्याची प्रेरणा आहे.
या उपक्रमामुळे रिसोड शहरात स्वच्छतेबाबत नवचेतना निर्माण झाली असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली आहे.











