हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Accident: भरधाव ट्रकची भीषण धडक; दुचाकीवरील बाप-लेकाचा जागीच मृत्यू

On: November 15, 2025 11:14 AM
Follow Us:
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

पिंपळगाव राजा/प्रतिनिधी

Accident news : पिंपळगाव राजा–भालेगाव बाजार मार्गावर 13 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ही घटना घडली.

कवडगाव येथील गणेश शेषराव जाधव (35) हे MH-28 AL-3745 या दुचाकीवरून पिंपळगाव राजा येथून घरी परतत होते. सोबत पत्नी सपना जाधव (30), मुलगा आर्यन (10), अरुण (4) आणि सात महिन्यांचा रुद्र होते. ते भालेगाव बाजारमार्गे जात असताना RJ-11 GA-7002 क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातात गणेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर सर्व जखमींना खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आर्यन जाधव (10) यालाही मृत घोषित करण्यात आले.

चालक फरार — पोलिसांकडून गुन्हा दाखल

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून तक्रारीवरून चालकाविरुद्ध कलम 106(1), 281, 342(4), 125 क, 125 ख बीएसएन 2023 तसेच मोटार वाहन अधिनियम 184, 134(a), 187 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंत्यसंस्कार

मृत पिता-पुत्रावर कवडगाव येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment