हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पिक विम्यासाठी शेतकऱ्यांचा उद्रेक! क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रिसोड-वाशिम हायवेवर चक्काजाम

On: January 9, 2026 7:46 PM
Follow Us:
पिक विम्यासाठी रिसोड-वाशिम महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा चक्काजाम आंदोलन

वाशिम/नारायणराव आरु पाटील

पिक विमा आंदोलन वाशिम या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून वाशिम जिल्ह्यात २०२४-२५ खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. सोयाबीनसह इतर पिके वाहून गेली असून नुकसान भरून न निघणारे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सरकार व पिक विमा कंपनी यांच्यातील साटेलोट्यामुळे शेतकऱ्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत विमा कंपनीच्या सांगण्यावरून उंबरठा अट लागू करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा न झाल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेने रिसोड-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर पाचमल आडोळी फाटा येथे चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सरकारने तात्काळ मध्यस्थी करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

हे पण वाचा..

वाकद शिवार ते धोडप रस्त्यापर्यंत पांदण रस्ता मंजूर करा – लखनसिंह ठाकूर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

या आंदोलनात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण पाटील मते, वाशिम जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे, गजानन पैठणकर, पांडुरंग कढणे, संदीप खोलगडे, गजानन घाटूळकर, पांडुरंग देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

हे पण वाचा..

भर जहागीर गावात घाणीचे साम्राज्य! निवेदन देऊनही प्रशासन गप्प; नागरिक संतप्त.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment